शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीही उतरले संपात

By admin | Updated: July 20, 2014 02:03 IST

खामगाव पालिका कर्मचार्‍यांचा संप : प्रशासकीय कामांसह इतर कामेही होणार ठप्प !

खामगाव: आपल्या विविध न्याय मागण्यासाठी नगर पालिका कर्मचार्‍यांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे. या संपात पालिकेतील अग्निशमन विभागासह आरोग्य विभागातील कर्मचारीही उतरले आहेत. पालिकेतील कर्मचारी मोठय़ासंख्येने सहभागी झाल्याने प्रशासकीय कामांसह इतर दैनंदिन कामकाजही प्रभावित होणार असल्याचे चित्र आहे.महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी/ संवर्ग कर्मचारी संघटनेच्यावतीने कर्मचार्‍यांच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी टप्प्या टप्प्याने आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये सामान्य प्रशासन आणि इतर कार्यालयातील १८0 कर्मचारी सुरूवातीला संपात सहभागी झाले. त्यानंतर शुक्रवार १८ जुलैपासून अग्निशमन आणि आरोग्य विभागातील कर्मचारी संपाला बळकटी दिली असून रविवार २0 जुलै पासून पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी संपात उतरणार आहेत. त्याचप्रमाणे सोमवार २१ जुलैला आरोग्य विभागाअंतर्गत सफाई कामगार संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे शहरातील साफसफाईसह पाणी पुरवठय़ाचा प्रश्नही ऐरणीवर येणार असल्याचे संकेत दिसत आहेत. खामगाव नगर पालिकेतील विविध विभागात सुमारे ४0२ कर्मचारी कार्यरत आहेत. या पैकी बहुतांश कर्मचारी संपात सहभागी झाल्यामुळे पालिकेच्या विविध विभागातील प्रशासकीय कामकाज प्रभावित झाले आहे. नगर पालिका कर्मचारी व सेवानवृत्त कर्मचार्‍यांची सहाव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम त्वरीत अदा करण्यात यावी, कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी शंभरटक्के अनुदान देण्यात यावे, नगर पालिकेतील अनुकंपाधारकास तात्काळ नियुक्ती देण्यात यावी, सफाई कामगारांना मोफत घरे बांधून देण्यात यावा, नगर पालिका कर्मचार्‍यांना कालबध्द पदोन्नती तात्काळ लागू करावी, कर्तव्य बजावताना अपंगत्व आलेल्या कर्मचार्‍यांना व अपंग कर्मचार्‍यांना विशेष लाभ देण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी नगर पालिका कर्मचार्‍यांनी गेल्या काही दिवसांपासून हा बेमुदत संप पुकारला आहे. *शिकाऊ उमेदवारांवर ताण !पालिकेतील विविध विभागातील कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे पालिकेतील विविध विभागाचा ताण काही मोजक्या कर्मचार्‍यांवर आला आहे. कंत्राटी कर्मचार्‍यांसह १८-२0 शिकाऊ कर्मचार्‍यांना पालिकेचा प्रभार सांभाळावा लागत आहे.