शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

वीज रोहित्र, विद्युत तार चोरणारी टोळी जेरबंद!

By admin | Updated: July 21, 2016 00:57 IST

बुलडाणा जिल्ह्यात वीज चो-या करणा-या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.

बुलडाणा : विद्युत तार ट्रान्सफार्मर तेल व त्याचे भाग इत्यादी चोरी होण्याच्या प्रकारात राज्यभरात वाढ झाल्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी खंत व्यक्त केली होती. सदर बाब शेतकर्‍यांच्या अस्मितेशी संबंधित असल्यामुळे गुन्हे तत्काळ उघडकीस आणून गुन्हेगारीविरुद्ध कडक कारवाई करण्याबाबतचे निर्देश दिलेले होते. त्यानुसार अवघ्या २४ तासांचे आत वीज ट्रान्सफार्मर तार चोरणारी टोळी जेरबंद करण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने २0 जुलै रोजी केली.याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती यांचे आदेशान्वये पोलीस अधीक्षक संजयकुमार बावीस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक श्‍वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.प्रताप शिकारे यांच्या नेतृत्वात पोउपनि एम.एम. सैयद, एएसआय प्रकाश राठोड, राजेश ठाकूर, नंदकिशोर धांडे, रामु मुंढे, संदीप मोरे, शे.नदीम, विवेक तायडे, भारत जंगले यांनी गोपनीय माहिती काढून अमडापूर येथे नाकाबंदी करून आरोपी सैयद हमीद सैयद इमाम रा.अमडापूर यास वाहनासह ताब्यात घेतले. यावेळी त्यांचे ताब्यातील वाहनामध्ये पो.स्टे. रायपूर व अहमदनगर जिल्हय़ातील चोरलेल्या ट्रान्सफार्मरचा मुद्देमाल, असा एकूण किंमती ३ लाख ७00 रुपयांचा मुद्देमाल वाहनासह जप्त करण्यात आला. सदर आरोपीने बुलडाणा जिल्हय़ातील डोणगाव, जानेफळ या पो.स्टे.च्या हद्दीसह अहमदनगर जिल्हय़ातसुद्धा चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्यासोबत आणखी सहआरोपी असल्याची शक्यता असल्याने पुढील तपास कार्यवाहीसाठी आरोपी व मुद्देमाल पो.स्टे.रायपूर येथे ताब्यात घेऊन अप.नं.६२/२0१६ कलम ३७९, ३४ भादंवि सहकलम १३६ भारतीय विद्युत कायद्याप्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे. अशाप्रकारच्या टोळ्यांवर पोलीस लक्ष ठेवून असून, आणखी कारवाई करण्यात येणार आहे.