शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

मोताळा तालुक्यातील १३ ग्रा.पं.ची निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 01:59 IST

मोताळा : शासनाने जाहीर केलेल्या सरपंचाची निवडणूक थेट जनतेतूून होणार असल्याच्या निर्णयामुळे येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या  निवडणुकीत मोताळा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवडणूक ही थेट जनतेमधून होणार आहे, त्यामुळे वेगवेगळ्या पॅनलच्या नावाखाली होणारी अंतर्गत गटबाजी संपुष्टात येणार आहे 

ठळक मुद्देशासनाच्या नव्या निर्णयाची अंमलबजावणी  गटबाजी संपुष्टात येणार!

शंकर तेलंग। लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : शासनाने जाहीर केलेल्या सरपंचाची निवडणूक थेट जनतेतूून होणार असल्याच्या निर्णयामुळे येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या  निवडणुकीत मोताळा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवडणूक ही थेट जनतेमधून होणार आहे, त्यामुळे वेगवेगळ्या पॅनलच्या नावाखाली होणारी अंतर्गत गटबाजी संपुष्टात येणार आहे राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील मतदारांना आपल्या हक्काचे आपल्या मनाप्रमाणे गावाचा प्रथम नागरिक अर्थात सरपंच निवडण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पॅनलच्या नावाखाली गावात चालणारी गटबाजी जी निवडणुकीनंतरही गावकर्‍यांमध्ये दुही निर्माण करायची ती या निवडीने कायमची संपुष्टात येणार आहे. संभाव्य उमेदवार डोळ्यासमोर ठेवून जरी जनतेने मतदान केले, तरी पॅनल ठरवेल तोच सरपंच गावाच्या माथी मारल्या जायचा व इच्छा नसतानाही गावकर्‍यांना तो गुपचुप स्वीकारावा लागायचा. पॅनल हे गावातील श्रीमंत व्यक्तिचे  असायचे, त्यामुळे सरपंचपद ही घराणेशाहीत असायचे. सरपंच पद कोणतेही आरक्षित असले, तरी आपल्या र्मजितील व शक्यतो अडानी अशिक्षित उमेदवार हा सरपंच म्हणून समोर केल्या जात होता. सत्ता आपल्याकडे  ठेवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवल्या जायच्या, हव्या त्या गोष्टीचे आमिष दाखवले जायचे. सदस्यांची पळवापळवी होऊन रक्तरंजीत लढायासुद्धा होत होत्या; परंतु आता राज्य सरकारने जाहीर केलेल्या जनतेतून सरपंच निवडणुकीमुळे आपल्या गावाच्या योग्यतेनुसार सरपंच आपल्याला निवडता येईल, त्यामुळे जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. मोताळा तालुक्यात १३ ग्रामपंचायतींमध्ये १२१ सदस्य निवडले जाणार असून, त्यामध्ये एससी - ९, एसटी २, ओबीसी १३, तर राखीव महिलांमध्ये महिला १0,  एसटी १, ओबीसी १६,  इतर ४0 असून, सर्वसाधारणसाठी २0 असे १२१  सदस्य संख्या राहणार आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये निवडणुका होणार्‍या ग्रामपंचायतींमध्ये  राजुर, लपाली, पिंप्री गवळी, डिडोळा बु., गोतमारा, शेलगाव बाजार, माळेगाव, गुळभेली, कोहाळा, महाळुगी जहागीर, चिंचपूर, तालखेड, चावर्दा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 

असे आहेत गावानुसार सरपंच पदाचे आरक्षण राजुर-सर्वसाधारण, लपाली-सर्वसाधारण,प्रि .गवळी- सर्वसाधारण, डिडोळा बु. -सर्वसाधारण,गोतमारा-सर्वसाधारण,शेलगाव बाजार- सर्वसाधारण स्त्री, माळेगाव-सर्वसाधारण स्त्री, गुळ भेली- सर्वसाधारण स्त्री, कोहाळा- ओबीसी, महाळुंगी जहागीर- ओबीसी , चिंचपूर-ओबीसी  महिला, तालखेड- ओबीसी महिला, चावर्दा- एससी लेडीज असे ग्रामपंचायतनिहाय आरक्षण आहे.