शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

ई-पॉस मशीन ठरणार डोकेदुखी

By admin | Updated: July 3, 2017 01:16 IST

स्वस्त धान्य दुकानदारांना योग्य प्रशिक्षण मिळाले नाही!

राजू पठाण। लोकमत न्यूज नेटवर्कसुलतानपूर : सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता यावी, या हेतूने शासनाने १ जुलैपासून प्रत्येक स्वस्त धान्य दुकानामध्ये बायो मेट्रिक पद्धतीचा वापर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तालुक्यातील सर्वच धान्य दुकानदारांना ई-पॉस मशीनचे वाटप केले असले, तरी मशीन देत असताना ९० दुकानदारांना एकाच वेळी केवळ एक तास मशीन हाताळणीचे प्रशिक्षण दिले. हे अल्पावधीचे प्रशिक्षण अनेक दुकानदारांच्या डोक्यावरून गेल्याने, ई-पॉस मशीन त्यांची डोकेदुखी ठरणार असल्याचे दुकानदारांमध्ये बोलल्या जात आहे. मशीन हाताळण्याचे किमान दोन दिवसांचे तरी प्रशिक्षण दिले जावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्राधान्य कुटुंबापैकी १८ वर्षांवरील कोणत्याही सज्ञान सदस्याचा अंगठा टेकविल्यानंतरच धान्य मिळणार असून, अशा लाभार्थी कुटुंबातील व्यक्तीचा आधार क्रमांक जोडण्याची मुदत १५ जून असताना अनेक धान्य दुकानदारांनी टाळाटाळ केल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्यामुळे अनेक धान्य लाभार्थींची पंचाईत होऊन त्यांच्यावर धान्य लाभापासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे. किंबहुना शासनाकडून दुकानदारांना मिळालेल्या आधार लिंकिंगच्या यादीनुसार काही कुटुंबांची किंवा कुटुंबातील व्यक्तीची नावे वगळली गेली, अशांची सुधारित यादी स्वस्त धान्य दुकानदारांनी संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे २ जानेवारी २०१७ रोजीच दिलेली असताना आजपर्यंतही धान्य दुकानदारांच्या यादीत तशी दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळेसुद्धा अशा लाभार्थींना धान्यापासून वंचित राहण्याची वेळ येऊन त्यांचा धान्य दुकानदारांवर रोष ओढावणार आहे. त्यामुळे सदर याद्या दुरुस्तीचे काम तत्काळ करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. दुकानदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्षशासकीय गोदामातून थेट धान्य दुकानापर्यंत माल पोहचविण्याची जबाबदारी शासनाची असताना तसे केल्या जात नाही. उलट अनेकवेळा गोदामातून दुकानदारांना आॅनस्टँडर्ड माल घेण्यास बाध्य केल्या जाते. तसेच धान्य दुकानदार हा शासन आणि सामान्य जनता यांना जोडणारा दुवा असताना ई-पॉस मशीनसारखा उपक्रम राबविण्यास त्यांच्यावर सक्ती करुन त्यांना मिळणारे धान्य मानधन व त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केले जाते, अशी माहिती अनेक दुकानदारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.