शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

सुक्ष्म सिंचन संचासाठी ‘ई - ठिबक’ प्रणाली

By admin | Updated: April 28, 2017 11:37 IST

पंतप्रधान कृषि सिंचन योजनेतंर्गत शेतक-यांकडून अर्ज मागविण्याकरिता ‘ई-ठिबक’ आज्ञावली विकसित करण्यात आली आहे.

बुलडाणा : पंतप्रधान कृषि सिंचन योजनेतंर्गत सुक्ष्म सिंचन योजना २०१७-१८ या वर्षाकरीता सुक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी आॅनलाईन नोंदणी करणे व शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्याकरिता ह्यई-ठिबकह्ण आज्ञावली विकसित करण्यात आली आहे. ही आज्ञावली १ मे २०१७ पासून सुरू होत आहे.  या आज्ञावलीवर शेतकऱ्यांना आॅनलाईन नोंदणी करण्यास व शेतकऱ्यांकडून अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. ही आज्ञावली १ मे २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत सुरू राहणार आहे.  ई-ठिबक आज्ञावलीवर शेतकरी नोंदणीसाठी लाभार्थ्यांचा आधार क्रमांक हाच लाभार्थ्याचा लॉग ईन आयडी असणार आहे. शेतकरी अर्जामध्ये अर्जदारांची संमती असल्याबाबत सुक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार संबंधीत माज्या वैयक्तिक माहितीचा उपयोग करण्यास माझी सहमती आहे या तरतुदीचा समावेश करण्यात आला आहे. ई-ठिबक आज्ञावली केंद्र शासनाच्या डीबीटी (डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर) पोर्टलशी जोडण्यात येत आहे. यास्तव अर्जदाराच्या जन्मदिनांकाचा समावेश शेतकरी नोंदणी अर्जामध्ये करण्यात आला आहे. लाभार्थी नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड यंत्रणेद्वारे आधार कार्डचा डाटा ई- ठिबक आज्ञावलीशी संलग्न करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. तोपर्यंत लाभार्थ्यांना आधार अपलोड करण्याची सुविधा निर्माण करून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज सादर केल्यानंतर स्वयंचलीत संगणकीय प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना उपलब्ध अनुदानाच्या मयार्देत आॅनलाईन पुर्वसंमती प्रदान करण्यात येईल.पुर्वसंमती दिल्यानंतर शेतकऱ्यांचे ३० दिवसांच्या कालावधीत सुक्ष्म सिंचन संच बसवून, देयकाची प्रत ई-ठिबक आज्ञावलीवर अपलोड करणे बंधनकारक आहे. विहीत कालावधीत शेतकऱ्यांनी देयकाची प्रत अपलोड न केल्यास लाभाथ्यार्चा अर्ज ई-ठिबक आज्ञावलीतून आपोआप रद्द करण्याची व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. लाभार्थ्याचा अर्ज रद्द झाल्यानंतर पूर्व संमती आपोआप रद्द होईल. तथापी लाभार्थ्यांस योजनेचा लाभ घेण्यासाठी पुन्हा अर्ज करता येईल. शेतकऱ्याला स्वयं घोषणापत्र देणे लाभार्थ्यास बंधनकारक आहे. अर्जामध्ये संच उत्पादक व वितरक यांचा समावेश असणार नाही. संच उत्पादकांचे व वितरकाचे नाव बील इनव्हाईस एंट्री नंतर मोका तपासणीच्या वेळी घेण्याची सुविधा देण्यात आली आहे.पूर्वसंमती प्राप्त केल्यानंतर ३० दिवसांच्या कालावधीत सुक्ष्म सिंचन संच बसवून ई-ठिबक आज्ञावलीमध्ये बील इनव्हाईस अपलोड करणे व अनुदान मागणीचा प्रस्ताव विहीत कालावधीत आवश्यक कागदपत्रांसह तालुका कृषि अधिकारी कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. अर्जदारास विविध टप्प्यावर झालेल्या कार्यवाहीची माहिती मोबाईलद्वारे एसएमएस अलर्ट पाठविण्याची सुविधा निर्माण करण्यात आली असल्यामुळे मोबाईल क्रमांक बिनचूकपणे नोंदविणे आवश्यक आहे.