शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

पाथर्डी घाटात वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:54 IST

वाहनाच्या  धडकेत बिबट्या जागीच ठार  झाल्याची घटना पाथर्डी ता.मेहकर घाटात १४ सप्टेंबर रोजी  सायंकाळी ६ वाजेदरम्यान घडली. या परिसरात तीन महिन्या त तीन बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देतीन महिन्यात तिसरा बळी!मेहकर तालुक्यातील पाथर्डी घाटात घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्कजानेफळ : वाहनाच्या  धडकेत बिबट्या जागीच ठार  झाल्याची घटना पाथर्डी ता.मेहकर घाटात १४ सप्टेंबर रोजी  सायंकाळी ६ वाजेदरम्यान घडली. या परिसरात तीन महिन्या त तीन बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.मेहकर-खामगाव मार्गावर वरवंड ते पाथर्डी गावादरम्यान  असलेल्या पाथर्डी घाटात सायंकाळी ६ वाजेदरम्यान रस्ता  ओलांडत असलेल्या एक वर्षीय बिबट्यास अज्ञात वाहनाने  धडक दिल्याने बिबट्या रस्त्याच्या कडेला फेकला जावून  त्याच्या मानेजवळ जबर मार बसला. तसेच नाकातून  रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला आहे. सदर  घटना या मार्गावरुन जात असलेले प्रमोद देशमुख यांना  समजल्याने त्यांनी सदर बिबट्याच्या मृत्युच्या घटनेची माहि ती वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पाटील यांना मोबाईलद्वारे  कळविल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच वन पाल नागरे, वनपाल संदीप परिहार, वनरक्षक देशमुख, फुले,  विभूते आदिंनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. रात्री  उशिरापर्यंत वनविभागाची कार्यवाही सुरू होती. जुलै महिन्यात जानेफळ येथील शाम गट्टाणी यांच्या शेतात       घडलेल्या बिबट्याच्या घातपाताच्या घटनेपासून  बिबट्याच्या मृत्युच्या सारख्या घटना सुरूच असून मागील  ऑगस्ट महिन्यात नजिकच्या हिवरा खुर्द येथे सुद्धा  बिबट्याच्या घातपाताची घटना घडलेली आहे. त्यातील  आरोपींचा अद्याप शोध लागलेला नसताना आज पाथर्डी  घाटात सुद्धा बिबट्या मृत्यू झाला. आजची घटना ही अपघात  असल्याची माहिती वनअधिकार्‍यांनी आमच्या प्रतिनिधींशी  बोलताना दिली आहे.