शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात संचारबंदीच्या काळातच ४४ टक्क्यांनी वाढले काेराेनाचे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 11:54 IST

Corona Cases in Buldhana : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ३१ मार्च ते १४ एप्रिल या पंधरवड्याच्या तुलनेत तब्बल ४४ टक्क्यांनी वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना प्रतिबंधासाठी लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांच्या काळातच जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ३१ मार्च ते १४ एप्रिल या पंधरवड्याच्या तुलनेत तब्बल ४४ टक्क्यांनी वाढली आहे. पॉझिटिव्हिटी रेटही एक टक्क्यांनी वाढून १५ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या १५ दिवसात १५ हजार ३३ कोरोनाबाधित तपासणीत समोर आले आहेत.कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लादत संचारबंदी घोषित केली आहे.  नेमक्या याच काळात पूर्वीच्या तुलनेत ४४ टक्के अर्थात १५ हजार ३३ रुग्ण वाढले आहे. ३१ मार्च ते १४ एप्रिलदरम्यान जिल्ह्यात ७६ हजार ५९ संदिग्ध रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या.  त्यात १० हजार ३७० जण बाधित निघाले, तर याच कालावधीत २,१३२ जणांनी कोरोनावर मात केली होती. त्याच्या तुलनेच १५ एप्रिल ते ३० एप्रिलदरम्यान जिल्ह्यात एक लाख एक हजार ४१० संदिग्धांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये १५ टक्के पॉझिटिव्हिटी रेटनुसार १५ हजार ३३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे संचारबंदीतही कोरोनाचा आलेख जिल्ह्यात चढाच असल्याचे निदर्शनास येत आहे.

या कारणामुळे वाढली रुग्णसंख्या  सकाळी ७ ते ११ यावेळेतच भाजीपाला, दूध, किराणा वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याची मुभा होती. त्यामुळे बाजारात एकाच वेळी मोठी गर्दी होत होती. व्यावसायिकांनी निर्धारित करून दिलेली वेळ पाळली नाही. त्याचाही फटका बसला.  संदिग्धांचे अहवाल जवळपास ७ ते ८ दिवसांनंतर कळत होते. या विलंबाचा हातभार कोरोना संसर्ग वाढण्यास झाला. स्वॅब दिल्यानंतर संदिग्ध घरीच क्वाॅरण्टीनमध्ये न राहता फिरत होते.   १५ एप्रिल ते ३० एप्रिलदरम्यान पूर्वीच्या तुलनेत संदिग्धांच्या चाचण्या २५ टक्क्यांनी वाढविण्यात आल्या होत्या. त्यामुळे कोरोनाबाधितांचेही प्रमाण वाढले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या