शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा काढण्यात कनेक्टिव्हिटीचा खोडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:01 IST

बुलडाणा : शेतमालाचा पीक विमा काढण्याकरिता शेतकरी बँकांमध्ये गर्दी करीत आहेत. मात्र, बँकांमध्ये कनेक्टिव्हिटी नसल्याने शेतकºयांना दिवसभर रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देबँकांमध्ये लागल्या रांगाशेतकरी ताटकळतपीक विम्यापेक्षा प्रवासाचा खर्च अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शेतमालाचा पीक विमा काढण्याकरिता शेतकरी बँकांमध्ये गर्दी करीत आहेत. मात्र, बँकांमध्ये कनेक्टिव्हिटी नसल्याने शेतकºयांना दिवसभर रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.यावर्षी पीक विमा काढताना शेतकºयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीला शासनाने आॅनलाइन पीक विमा काढण्याची अट घातली. आॅनलाइन पीक विमा काढणे शेतकºयांना शक्य झाले नाही. त्यामुळे शासनाने या निर्णयामध्ये बदल करीत पूर्वीप्रमाणेच आॅफलाइन विमा काढण्याचा आदेश दिला. मात्र, सदर आदेश मुदत संपण्याच्या दोन दिवसांपूर्वीच देण्यात आल्याने शेतकरी पीक विमा काढण्यापासून वंचित राहिले. त्यानंतर शासनाने ५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिल्याने बुधवारी जिल्ह्यातील अनेक शेतकरी बँकांमध्ये पीक विमा काढण्याकरिता गोळा झाले. बँकेत रांगा लावल्यानंतर कनेक्टिव्हिटीच नसल्याने शेतकºयांना तासन्तास ताटकळत बसावे लागले. प्रत्येक बँकेत बुधवारी मोठ्या प्रमाणात कनेक्टिव्हिटीची समस्या निर्माण झाली. त्यामुळे अखेरीस बँकेच्या रांगेत असलेल्या अनेक शेतकºयांना विमा न काढताच परत जावे लागले. जिल्ह्यात ग्रामीण भागात राहणारे शेतकरी पैसे खर्च करून बँकेत विमा काढण्याकरिता आले. मात्र, कनेक्टिव्हिटीअभावी त्यांना परत जावे लागले. त्यामुळे शेतकºयांना नाहक आर्थिक भुर्दंड बसला आहे.पीक विम्यापेक्षा प्रवासाचा खर्च अधिकशेतकºयांना ग्रामीण भागातून शहरातील बँकांमध्ये पीक विमा काढण्याकरिता यावे लागते. त्यानंतर कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे पुन्हा दुसºया दिवशी यावे लागते. त्यामुळे शेतकºयांना एका पिकाचा विमा काढण्यापेक्षा गावातून शहरात ये - जा करण्याचा प्रवास खर्चच अधिक करावा लागत आहे.अनेक बँकांमध्ये कनेक्टिव्हिटी नसल्याने शेतकरी पीक विम्यापासून बुधवारी वंचित राहिले. गावावरून पैसे खर्च करून शेतकरी बँकेत येतात. मात्र, येथे त्यांना कनेक्टिव्हिटीमुळे तासन्तास ताटकळत बसावे लागते. तसेच काही बँकेचे अधिकारी त्यांना पीक विमा मुदतवाढीचा अध्यादेशच मिळाला नसल्याचे कारण सांगून शेतकºयांना परत पाठवित आहेत. वरिष्ठांनी याची त्वरित दखल घेण्याची गरज आहे.- लखन गाडेकरकिसान सेना, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना.