शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पोळा सणावर दुष्काळाचे सावट

By admin | Updated: August 24, 2014 01:00 IST

बाजारपेठ सजली; व्यापारी शेतकर्‍यांच्या प्रतीक्षेत

लोणार : पावसाने दडी मारल्यामुळे शेतकर्‍यांना दुबार ते तिबार पेरणी करावी लागली. त्यामध्येही आता खरीप हंगामाची पिके धोक्यातच असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. बैलांना सजविण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याने दरवर्षीप्रमाणे बाजारपेठ फुलली असली तरी व्यापार्‍यांना शेतकर्‍यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. सर्वत्र दुष्काळसदृश स्थिती असल्यामुळे पोळा सणावर विरजण पडले आहे.कृषिप्रधान देशात बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण असून, ज्यांच्याकडे शेती नाही, ते मातीच्या बैलांची पूजा करून पोळा सण साजरा करतात. वर्षभर शेतात राबराब राबणार्‍या सर्जा - राज्याच्या या सणाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. या वेळेस पावसाचा जोर कमी होऊन शेतात पिके डोलताना दिसतात. शेतशिवारात सगळीकडे हिरवळ असते. एकूण शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण असते; परंतु यावेळेस खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच अल्प प्रमाणात झालेल्या पावसावर शेतकर्‍यांनी पेरण्या केल्या; परंतु बहुतांश शेतकर्‍यांच्या सुरुवातीच्या पेरण्या वायाच गेल्या. पावसाने हुलकावणी दिल्यामुळे अनेक शेतकर्‍यांना दुबार ते तिबार पेरणी करावी लागली. यामध्ये महागडे बी-बियाणे, रासायनिक खते वापरल्यामुळे शेतकर्‍यांना चांगलाच आर्थिक फटका बसला. सद्यपरिस्थितीतसुद्धा खरीप हंगामाची पिके धोक्यातच असल्याने उंबरठय़ावर येऊन ठेपलेल्या पोळा सणाला शेतकर्‍यांमध्ये उत्सुकता दिसून येत नाही. २५ ऑगस्ट रोजी पोळा सण असून, बैल सजविण्यासाठी लागणार्‍या साहित्याने बाजारपेठ सजली आहे; परंतु आठवडी बाजाराच्या दिवशीसुद्धा पोळ्यानिमित्त बैल सजावटीचे साहित्य विक्री करणार्‍या दुकानांमध्ये शुकशुकाट दिसून येत होता. बुलडाणा परिसरातील आठवडी बाजारात शुकशुकाट दिसून येत आहे. अनेक व्यापार्‍यांनी पोळ्यानिमित्त आठवडी बाजारातील मुख्य रस्त्यावर दुकाने थाटली आहेत; मात्र दरवर्षी प्रमाणे यावर्षी शेतकरी वर्ग साहित्य घेताना दिसून येत नसल्याचे दिसून येत आहे.