शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
2
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
3
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
4
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
5
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
6
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
7
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
8
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
9
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
10
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
11
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
12
रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार
13
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
14
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
15
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
16
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
17
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
18
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
19
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
20
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

जिल्ह्यात वर्षभरात मुलींच्या जन्मदरात घट

By admin | Updated: April 6, 2017 22:51 IST

बुलडाणा- जिल्ह्यात ‘बेटी बचाओ’ अभियान शुद्धपातळीवर राबविण्यात येत असले तरी मुलींच्या जन्मदरात घटच झाल्याने ‘बेटी बचाओ’ अभियानाला धक्का बसला आहे.

‘बेटी बचाओ’ अभियानाला धक्का : भ्रूण हत्येची ३४ प्रकरणे न्यायालयात

बुलडाणा : जिल्ह्यात गत एक वर्षात जन्मलेल्या अपत्यांमध्ये मुलींची संख्या कमी असून, मुलांची अधिक आहे. जिल्ह्यात ‘बेटी बचाओ’ अभियान शुद्धपातळीवर राबविण्यात येत असले तरी मुलींच्या जन्मदरात घटच झाल्याने ‘बेटी बचाओ’ अभियानाला धक्का बसला आहे. जिल्ह्यात स्त्री-पुरुष जन्माचे प्रमाण २०१६ मध्ये ९१५/१००० एवढे होते; मात्र मार्च २०१७ मध्ये स्त्री-पुरुष जन्माचे प्रमाण ९०३/१००० पर्यंत जिल्ह्यात खाली आले आहे. आरोग्य विभागाकडून स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी आणि स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी विविध उपाययोजना आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमावर भर दिला जात आहे. शिवाय स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून अनेक कारवाया करण्यात आल्या. यात ३४ प्रकरणे दाखल आहेत. यात प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे १४ प्रकरण, जिल्हा न्यायालयाकडे १२ प्रकरण, उच्च न्यायालयात १६ तर सर्वोच्च न्यायालयात १ प्रकरण दाखल आहे.प्रबोधनात्मक कार्यक्रम व दंडात्मक कारवाया होत असतानाही जिल्ह्यातील मुलींचे घटते प्रमाण चिंतेचा विषय ठरत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील नोंदणी प्रमाणे विविध शासकीय रुग्णालयात गत एक वर्षात ३३४६ बाळांचा जन्म झाला. यात मुले १७१८ असून, मुलींची संख्या १६२८ एवढी आहे. या स्त्री-पुरुष जन्मदरात ९० चा फरक आढळून आला आहे. जिल्ह्यातील घटती मुलींची संख्या चिंतेचा विषय असून जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागात येणाऱ्या दिवसात महत्वपुर्ण पाऊल उचल्याची गरज निर्माण झाली आहे.प्रशासन करणार उपाययोजनाजिल्ह्यातील घटता मुलींचा जन्मदर चिंतेचा विषय असून याबाबत जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग उपाययोजना करण्याच्या तयार आहे. यात ‘बेटी बचाव’ यासाठी जिल्ह्यात जनजागृती व कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाकडून जिल्हा, तालुका, शहर व ग्रामीण स्तरावर समिती स्थापन करण्यात येणार असून यात विविध प्रशासनकिय अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा सहभाग आहे. याशिवाय स्त्रीभृण हत्या रोखण्यासाठी व जनजागृतीसाठी राज्याची व जिल्ह्याची टोल फ्रि हेल्पलाईन, तक्रारीसाठी वेबसाईट, बेटी बचाओ बेटी पढाओ टोल फ्रि क्रमांक चालू करणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्स डॉ. ए.व्ही.सोनटक्के यांनी सांगितले.