शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

दारू विक्रेत्यावर आता हद्दपारीची कारवाई!

By admin | Updated: March 10, 2017 01:53 IST

अवैध दारूचे उच्चाटन; ग्रामरक्षक दलाची मदत घेण्याचे निर्देश

खामगाव, दि. ९- अवैध दारू विक्री व निर्मितीला पायबंद घालण्यासाठी गृहविभागाने अधिक कडक पावले उचलली असून, या उपाययोजनेमध्ये ग्रामरक्षक दलाला सहभागी करून घ्यावे, त्याबरोबरच वारंवार असा व्यवसाय कारणार्‍याविरुद्ध हद्दपारीची कारवाई प्रस्तावित केली आहे. तसे निर्देश पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला राज्य शासनाने दिले आहेत. अवैध दारू धंद्यावर निर्बंध आणण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने आता नवी चतु:सूत्री आखून दिली असून, या नियमाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. अवैध दारूची विक्री व निर्मिती करणार्‍या व्यक्तीस अटक करून त्याच्याविरुद्ध तीनपेक्षा अधिक वेळेस कारवाई झाली असेल, तर त्यांच्याविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियमाद्वारे हद्दपारीची कारवाई केली जाणार आहे. याशिवाय अवैध दारू निर्मिती, विक्रीसंदर्भात माहिती मिळताच त्वरित कार्यवाही करून गुन्हे दाखल करावेत, यामध्ये अवैध दारू निर्मिती, विक्रीमध्ये गुंतलेल्यांचा बरोबरच ज्याप्रकरणी अशा अवैध दारूची निर्मिती होत आहे, अशा जागेच्या मालकाचा सक्रिय सहभाग आहे, असे आढळून आल्यास त्यांच्याविरुद्धदेखील गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना पोलिसांना आहेत. ज्या ठिकाणी ग्रामरक्षक दल स्थापन करण्यात आले आहेत, अशा ठिकाणच्या ग्रामरक्षक दलाचे दोन सदस्य साक्षीदार म्हणून घ्यावेत, तसेच ती अवैध दारू कोठून व कोणत्या मार्गाने आणली, याबाबत संबंधित तपास अधिकार्‍यांनी तातडीने शोध घ्यावा. दारू पिऊन शांतता भंग करणारे व गुन्हेगारी कृत्य करणार्‍या सराईतांविरुद्ध दारूबंदी अधिनियमाच्या कलम ९३ अन्वये चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र घ्यावे, तर सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संयुक्त पथके कार्यान्वित अवैध दारू धंद्यावर निर्बंध आणण्याच्या दृष्टीने पोलीस विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी एकत्रितपणे कार्यवाही करण्यासाठी बैठका घ्याव्यात, तसेच दोन्ही विभागांनी स्वतंत्रपणे केलेल्या कार्यवाहीची माहिती एकमेकांना द्यावी व अशा कार्यवाहीसाठी पोलीस आयुक्त यांनी आयुक्तालय स्तरावर आणि पोलीस अधीक्षक यांनी जिल्हा स्तरावर संयुक्त पथके स्थापन करावयाची आहेत.