मेहकर : येथील जानेफळ फाट्याजवळ असलेल्या एका खदानीत विवाहित इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारला सकाळी ९ वाजता दरम्यान उघडकीस आली.यासंदर्भात माहिती अशी की, माळी पेठ भागात राहणार्या हकीम शाह सलीम शाह (२४) हा गत दोन दिवसांपासून घराच्या बाहेर होता. सर्व नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला. दरम्यान गुरुवारला जानेफळ फाट्यानजीक असलेल्या खदानीतील पाण्यात त्याचे प्रेत आढळून आले.हा अपघात की घातपात याचा पोलिस तपास करीत आहे.
पाण्यात बुडून इसमाचा मृत्यू
By admin | Updated: June 5, 2014 22:09 IST