शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

अवर्षणाचा रब्बीला फटका!

By admin | Updated: December 6, 2015 02:34 IST

रब्बी हंगामाचे नियोजन कोलमडले, केवळ २७ टक्के क्षेत्रावरच रब्बीचा पेरा.

खामगाव : सातत्यपूर्ण अवर्षणाच्या परिस्थितीमुळे खामगाव तालुक्यातील रब्बी हंगामही यावर्षी धोक्यात आला असून, नियोजित क्षेत्राच्या अवघ्या २७ टक्के क्षेत्रावरच प्रत्यक्ष पेरा झाला आहे. परिणामी, यावर्षी खरिपापाठोपाठ रब्बीच्या उत्पादनातही मोठी घट होण्याची साधार भीती कृषी क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत. खामगाव तालुक्यात १९ हजार ५५0 हेक्टरवर रब्बी पिकांचे नियोजन कृषी विभागाने केले होते; मात्र प्रत्यक्षात पाच डिसेंबरपर्यंत अवघे पाच हजार ३0९ हेक्टरवरच पेरणी झाली आहे, त्यामुळे तालुक्यात रब्बीचे उत्पादनही मोठय़ा प्रमाणावर घटण्याची भीती व्यक्त होत आहे. तालुक्याचा गेल्या तीन ते चार हंगामाचा विचार करता निसर्गाच्या अवकृपेमुळे खरीप व रब्बीचे हंगाम शेतकर्‍याच्या हातून गेले आहेत. परिस्थिती बदलेल, या अपेक्षेत शेतकरी होते; मात्र सलग दोन वर्षे अवर्षणाची स्थिती आल्याने आता तालुक्यातील कृषी क्षेत्रात त्याचे दृष्य परिणाम समोर येत आहेत. नाही म्हणायला खामगाव तालुक्यात मेहकर तालुक्यानंतरचे सर्वाधिक क्षेत्र हे सिंचनाखाली येते. तालुक्यात १२ टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे; पण प्रकल्पातील जलसाठय़ात पाण्याची पातळी झपाट्याने घटत असल्याने सिंचनाचीही समस्या निर्माण होत आहे. परिणाम स्वरूप नऊ हजार हेक्टरवर असलेले गहू पिकाचे नियोजन प्रत्यक्षात एक हजार ३४५ हेक्टरपर्यंंतच झाले आहे. हरभराही कसाबसा एक हजार ९७३ हेक्टरवर पोहोचला आहे. हरभर्‍याचेही नियोजन नऊ हजार ५२0 हेक्टरवर करण्यात आले होते; मात्र तेही कमी झाले आहे. हीच परिस्थिती मका, सूर्यफूल, करडई, कांदा व अन्य पिकांसंदर्भात दिसून येत आहे. एकीकडे महागाईचा वाढता डोंगर पाहता अवर्षणाच्या स्थितीमुळे अन्नधान्याचे उत्पादनही जिल्ह्यात कमी होण्याची भीती आहे. त्यामुळे महागाई येत्या काळात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यातील ११ महसुली मंडळात हीच स्थिती असून, ५५ हजार ४६0 शेतकरी तालुक्यात असून, एक लाख २0 हजार १७२ हेक्टर जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र असून, त्यापैकी ८३ हजार ६२१ हेक्टर क्षेत्र हे वहितीखाली आहे; पण रब्बीचे नियोजन हे फक्त १९ हजार ५५0 हेक्टवर करण्यात आले होते. त्यापैकी फक्त २७ टक्के क्षेत्रावरच रब्बीचा पेरा झाला आहे.