शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाचा तडाखा

By admin | Updated: January 3, 2015 00:57 IST

शेतकरी हवालदिल : मका, हरभरा, गहू, कांदा पिकांना फटका.

बुलडाणा : जिल्ह्यात बुधवारी रात्री पडलेल्या अवकाळी पावसामुळे धाड, मेहकर, बुलडाणा, जळगाव जामोद परिसरातील पिकांना मोठय़ा प्रमाणात फटका बसला. गारपिटीमुळे संग्रामपूर, नांदूरा परिसरातील पिकांचे नुकसान झाले आहे.मेहकर तालुक्यात बुधवार व गुरुवारला वादळीवार्‍यासह गारपीट व मुसळधार पाऊस झाला. यामध्ये काही भागातील शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. दरम्यान आ.डॉ.संजय रायमुलकर यांनी २ जानेवारी रोजी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तालुक्याला काही भागात तुरळक तर काही ठिकाणी पावसाचा मोठा फटका बसला. अकोला ठाकरे, खानापूर, खंडाळा देवी, खामखेड, उमरा, शहापूर, अंजनी बु., हिवरा साबळेसह इतरही भागात गारपीट झाली आहे. यामुळे हरभरा, गहू, मका, दादर, कांदा, मोहरी, तूर या पिकांचे मोठे नुकसान झाले. दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकरी त्रस्त असतांनाच या अवकाळी पावसाने पुन्हा शेतकर्‍यांच्या चिंतेत भर पाडली. अकोला ठाकरे येथील शेतकर्‍यांचे शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान २ जानेवारी रोजी आ.डॉ. संजय रायमुलकर यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश वाळूकर, उपप्रमुख समाधान साबळे, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, ग्रामसेवक घुगे, मंडळ अधिकारी लंबे उपस्थिती होती. यासंदर्भात आ. रायमुलकर यांनी जिल्हाधिकार्‍यांशी मोबाईलद्वारे संपर्क साधून नुकसानीची माहिती दिली. या नुकसानीचा त्वरित सर्व्हे करुन अहवाल पाठविण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले. *राहूल बोंद्रें यांच्यासह लोकप्रतिनिधींची भेटअवेळी कोसळलेल्या अस्मानी संकटाचा प्रतिकार करणार्‍या शेतकर्‍यांच्या भेटीसाठी चिखलीचे आ.राहुल बोंद्रे, बांधकाम सभापती अंकुशराव वाघ, नंदकिशोर शिंदे, भगवान भोंडे, प्रमोद बोर्डे, म.शफीक, अनिल फेपाळे, एकनाथ धंदर, वरुडचे उपसरपंच संतोष राऊत, सोयगावचे सरपंच समाधान बुधवत, जामठीचे सरपंच मंगेश तायडे यांच्यासह प्रकाश पांडव, रंगनाथ बुधवत, रंगराव पिंपळे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.