शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

ठिबकवरील पिके ऑक्सीजनवर

By admin | Updated: June 28, 2014 22:40 IST

पावसाअभावी शेतकर्‍यांचे खरीप पिकांचे नियोजन संपूर्ण गडबडले असून, ठिबक वरील पेरण्यासुद्धा ऑक्सीजनवर असल्यामुळे शेतकर्‍यांचे तोंडचे पाणी पळाले आहे.

मोताळा : तालुक्यात मृगनक्षत्र कोरडा गेला असून अपेक्षाकृत पावसाचे आगमन न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. आद्रा नक्षत्रातही पावसाचा रूसवा कायम दिसत असून पेरणी योग्य पावसाअभावी शेतकर्‍यांचे खरीप पिकांचे नियोजन संपूर्ण गडबडले असून, ठिबक वरील पेरण्यासुद्धा ऑक्सीजनवर असल्यामुळे शेतकर्‍यांचे तोंडचे पाणी पळाले आहे.मागील काही वर्षापासूनचा पावसाचा लहरीपणा पाहता धूळ पेरणी जरी तालुकयात झाली नसली तरी मृगाच्या भरवश्यावर जवळपास ८ हजाराच्यावर शेतकर्‍यांनी ठिबक वर कापसाची लागवड केल्याचे समजते. मृगात हमखास पावसाचे आगमन होत असल्याच्या आशेने विहिरीमधील पाण्याच्या भरवश्यावर या भागातील शेतकरी वर्ग ठिबकवर कापासाची लागवड करतो. विहिरीचे पाणी संपेपर्यंत मृगाचा पाऊस येत असल्यामुळे कापासाची पेरणी चांगल्याप्रकारे साधून उत्पादनसुद्धा मोठय़ा प्रमाणात शेतकर्‍यांना मिळत आले आहे. मात्र यावेळेस मृग कोरडा गेल्यामुळे तालुकाभरातील विहिरीची पाण्याची पातळी खोल गेली असून, बर्‍याच विहिरी आटल्यामुळे शेतकर्‍यांना हजार ते पंधराशे रूपयांपर्यंत पाणी विकत घेवून पिक वाचविण्याचा केविलवाणा प्रकार करावा लागत आहे. बहुतांश ठिकाणी पावसाळी वातावरणाअभावी पिकांची वाढ होत नसल्याचे शेतकरी सांगत असल्यामुळे शेतकरीवर्ग हतबल झाला आहे. तालुक्यात पावसाचा थेंबच पडला नसल्यामुळे कापसाच्या मुख्य पिकासह इतर पिकांचासुद्धा मौसम गेल्यामुळे शेतकरी येणार्‍या पावसावर शेतीचे नियोजन कसे करावे या चिंतेत शेतकरी पडला आहे. कापसाची लागवडीसाठी जूनचा पहिला आठवडा महत्वपूर्ण असून जेवढया लवकर लागवड होईल तेवढे या पिकासाठी फायदयाचे ठरते. जूूनच्या तीसर्‍या आठवडयापर्यंत केलेली कापसाची लागवड शेतकर्‍यांसाठी फायदयाची असते. कमी कालावधी मध्ये येणार्‍या पिकांसाठीसुद्धा हे वर्ष शेतकर्‍यांसाठी कठीण जात असून पावसाअभावी मुंग, उडीद, मटकी,चवळी आदीं पिकाची लागवड शेतकरी करू शकला नाही. १५ जून ते १५ जुलै या काळात या पिकांची पेरणी होणे आवश्यक असून अल्पकाळामधील हि पिके ६0 ते ७0 दिवसांमध्ये तयार होतात. मात्र या पिकांची पेरणी ३0 जूनच्या आतमध्ये होणे आवश्यक असल्याचे जाणकार सांगतात. मात्र या कालावधीनंतर या पिकांची पेरणी झाल्यास उत्पादन न होता फक्त नासाडी होते. पावसाच्या रूसव्यामुळे शेतकर्‍यांसह जनावरांच्या चारा-पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वत्र कोरडे वातावरण असल्यामुळे जनजीवनसुद्धा प्रभावीत झाले असून ठिबक वरील पिके शेवटच्या घटका मोजत आहेत.