शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

ढाब्यावर साहित्याची तोडफोड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:03 IST

संग्रामपूर : निपाणा येथील दारुच्या नशेत तर्रर असलेल्या सहा जणांनी ढाबा मालकाच्या भावाला मारहाण करीत  तोडफोड केल्याची घटना ३१ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता संग्रामपूर निपाणा रस्त्यावरील आकाश ढाब्यावर घडली. याप्रकरणी ढाबा मालकाच्या भावाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे एकास मारहाणसहा जणांना अटक

संग्रामपूर : निपाणा येथील दारुच्या नशेत तर्रर असलेल्या सहा जणांनी ढाबा मालकाच्या भावाला मारहाण करीत  तोडफोड केल्याची घटना ३१ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता संग्रामपूर निपाणा रस्त्यावरील आकाश ढाब्यावर घडली. याप्रकरणी ढाबा मालकाच्या भावाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.याबाबत ढाबा मालकाचे भाऊ संजय प्रल्हादराव देशमुख (वय ४७) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचा भाऊ नीळकंठ देशमुख हा जटाशंकर येथून दर्शन घेऊन परत येत असताना दुपारी २ वाजता दरम्यान करमोडा फाटा येथे त्याला ऋषिकेश सुभाष मोहे, गोपाल रामखन मोहे, गणेश किसन वानखडे यांनी जटाशंकर येथे पोलिसांना नावे का सांगितली, या कारणावरून मारहाण केली.त्याचवेळी गावातील संतोष रामेश्‍वर मसुरकार, प्रकाश निनाजी कांडेलकर, देवराज टेकाडे, ऋषिकेश सुभाष मोहे, गोपाल रामरतन मोहे, गणेश वानखडे हे सर्व दारु पिलेल्या अवस्थेत हातामध्ये लाठय़ा-काठय़ा घेऊन ढाब्यामध्ये आले. तेव्हा ढाबाचालक संजय देशमुख यांनी वरील सहा जणांना काय झाले, असे विचारले असता, त्यातील संतोष मसुरकर याने नीळकंठ देशमुख यांचे काही एक न ऐकता त्यांना मारहाण केली. त्यानंतर प्रकाश निनाजी कांडेलकर, देवराव नारायण टेकाळे, ऋषीकेश सुभाष मोहे, गोपाल रामरतन मोहे, गणेश किसन वानखडे यांनी संगणमत करून आकाश ढाब्यावरील फ्रीज, काउंटर, शीतपेयाच्या बॉटल्स ताट्यांना लाठय़ा, काठय़ा मारुन ढाब्यातील साहित्याची तोडफोड केली, तसेच जिवे मारण्याची धमकी दिली, अशा आशयाच्या फिर्यादीवरून तामगाव पोलिसांनी वरील सहा जणांविरुद्ध कलम १४३, १४७, १४९, ४२७, ४५२, ३२३, ५0४, ५0६, १३५ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला असून, संतोष रामेश्‍वर मसुरकार, प्रकाश निनाजी कांडेलकर, देवराज नारायण टेकाडे, ऋषीकेश सुभाष मोहे, गोपाल रामरतन मोहे, गणेश किसन वानखडे या सहा आरोपींना अटक केली आहे.