शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

द्वारपोच योजना थंड बस्त्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : ग्रामीण तथा शहरी भागातील स्वस्त धान्य दुकानदारांना घरपोच अन्नधान्य मिळावे, यासाठी शासनाने द्वारपोच योजना सुरू केली होती. परंतु ही द्वारपोच योजना मेहकर तालुक्यात थंड बस्त्यात असल्याने, वाहनधारकांचे लाखो रुपये थकले आहेत.ग्रामीण भागातील गोरगरिबांना वेळेवर अन्नधान्य मिळावे, अन्नधान्याची अफरातफर होऊ नये, यासाठी शासनाने मागील वर्षीपासून द्वारपोच योजना ...

ठळक मुद्देमेहकर तालुक्यातील प्रकार लाखो रुपये थकल्याने वाहनधारक त्रस्त!गोरगरिबांना अन्नधान्य मिळावे यासाठी शासनाने सुरू केली होती योजना

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : ग्रामीण तथा शहरी भागातील स्वस्त धान्य दुकानदारांना घरपोच अन्नधान्य मिळावे, यासाठी शासनाने द्वारपोच योजना सुरू केली होती. परंतु ही द्वारपोच योजना मेहकर तालुक्यात थंड बस्त्यात असल्याने, वाहनधारकांचे लाखो रुपये थकले आहेत.ग्रामीण भागातील गोरगरिबांना वेळेवर अन्नधान्य मिळावे, अन्नधान्याची अफरातफर होऊ नये, यासाठी शासनाने मागील वर्षीपासून द्वारपोच योजना सुरू केली होती. बुलडाणा जिल्ह्यातील द्वारपोच योजनेचे कंत्राट श्रीनाथ ट्रान्सपोर्ट कंपनीचे राजीव गुप्ता यांनी घेतलेले आहे. त्यांनी मेहकर तालुक्यात अन्नधान्य द्वारपोच पोहचविण्यासाठी वाहतूक ठेकेदाराची नेमणूक केली होती. या वाहतूक ठेकेदाराने जवळपास सात वाहने या योजनेसाठी लावलेली होती. सुरुवातीच्या काळात ही द्वारपोच योजना मेहकर तालुक्यात सुरळीत सुरू होती; परंतु त्यानंतर या द्वारपोच योजनेचा पूर्ण कारभार ढेपाळला होता. नियोजनाअभावी दुकानदारांचा माल वेळेवर जात नव्हता. त्यामुळे गोरगरिबांना वेळेवर धान्य पुरवठा होत नव्हता. मात्र, तेरी भी चूप मेरी भी चूप, असा कारभार सुरू असल्याने कोणीच बोलायला तयार नव्हते. अनेक दुकानदारांचा माल कमी-जास्त प्रमाणात जात होता. दरम्यान, गेल्या १० ते ११ महिन्यांपासून मेहकर तालुक्यात द्वारपोच योजना सुरू आहे; परंतु वाहतूक ठेकेदाराचे बिले थकली आहेत.वाहतूक ठेकेदारावर उपासमारीची पाळीद्वारपोच योजना राबविण्यासाठी वाहतूक ठेकेदाराने मेहकर तालुक्यासाठी गेल्या १० ते ११ महिन्यांपासून सात वाहने लावली होती. या वाहनधारकांना दरमहा वाहतुकीची बिले मिळाली नसून, जवळपास २० लाख रुपये थकले आहेत. त्यामुळे वाहतूक ठेकेदारावर उपासमारीची पाळी आली आहे.वाहतूक ठेकेदाराने त्यांची बिले न मिळाल्याने वाहने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तरीपण दुकानदारांना माल वेळेवर मिळावा, यासाठी पर्यायी व्यवस्था करुन, दुकानदारांना वेळेवर माल देऊ.- ए.एम. सय्यदनिरीक्षण अधिकारी, अन्नपुरवठा विभाग, मेहकर.