शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

डोणगाव ग्रा.पं. भ्रष्टाचाराची चौकशी होणार!

By admin | Updated: June 2, 2017 00:29 IST

सीईओंचे आश्वासन : सुबोध सावजी यांचे आंदोलन स्थगित

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : डोणगाव ग्रामपंचायत तसेच नागापूर, रत्नपूर, पार्डी यासह इतर गावांतील नळ योजना, एलएडी लाइट, रस्ते सुविधा, भ्रष्टाचाराची मालिका व अनियमितताप्रकरणी १ जून रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात बैठा सत्याग्रह करण्याचा इशारा माजी मंत्री सुबोध सावजी यांनी दिला होता. या आंदोलनाचा धसका घेत, ३१ मे रोजी या संपूर्ण प्रकरणात चौकशी करून कारवाईचे ठोस आश्वासन जि.प. मुकाअ एस. षण्मुखराजन यांनी दिल्याने सुबोध सावजी यांनी आंदोलन स्थगित केले.३१ मे रोजी सायंकाळी ६ वाजता जिल्हा परिषदेच्या आवारात पोलीस बंदोबस्तात माजी मंत्री सुबोध सावजी व शैलेश सावजी यांनी जि.प. मुकाअ षण्मुखराजन यांच्या कक्षात प्रवेश करुन चर्चा केली. यावेळी जि.प.चे उपमुकाअ लोखंडे, चोपडे, राजपूत तसेच ठाणेदार हिवाळे व पोलीस अधीक्षक कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते. गेल्या आठ वर्षांत डोणगाव ग्रामपंचायतने सर्वच कामात अनियमितता व कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला. दीडशे गाळ्यांचे परवानगी न घेता बीओटी तत्त्वावर बांधकाम केले. वित्त आयोगाच्या योजनेत एलएडी लाइट खरेदी न करता १२ लाखांचा अपहार केला. डोणगाव पाणीपुरवठा योजनेत तसेच नागापूर, रत्नापूर, पार्डी गावातील नळ योजनेत भ्रष्टाचार केला. पार्डी या १८०० लोक वस्तीच्या गावात गेल्या दहा वर्षांत सहा महिलांचा विहीरीत पडून मृत्यू झाला. पाच जण जखमी होऊन त्यांना कायमचे दिव्यांगत्व आले. गावकऱ्यांना भेटीसाठी गेले तेव्हा बीडीओ, तहसीलदार यांनी गावात भेट दिली नाही, त्यामुळे गावकरी आक्रमक झाले. या प्रश्नांवर उपमुकाअ लोखंडे यांनी नळ योजनेच्या कामात पाण्याचा स्रोत नव्हता, अशी कैफियत यावेळी सावजी यांनी मांडली. यानंतर मुकाअ षण्मुखराजन यांनी या प्रकरणात ग्रामसेवकाला निलंबन करण्याची कारवाई केली. ग्रा.पं. सदस्यांना नोटिस दिली. तसेच भ्रष्टाचारप्रकरणी योग्य व ठोस कारवाईचे आश्वासन दिल्याने १ जून रोजीचे आंदोलन तूर्तास स्थगित करीत आहे, असे सांगितले.