शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गटातटाचे राजकारण नको!

By admin | Updated: June 20, 2015 02:55 IST

शिवसेनेचा वर्धापन दिन; प्रतापराव जाधव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

बुलडाणा : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अत्यंत परिश्रम व कष्टाने शिवसेना ही संघटना उभी केली. याच संघटनेचा पक्ष झाला. महाराष्ट्रातील गावागावात बाळासाहेबांच्या कडव्या हिंदुत्ववादी विचाराचे सैनिक तयार झाले. अनेकांना पद, प्रतिष्ठा, सत्ता मिळाली. ती केवळ कार्यकर्त्यांच्या जोरावरच. म्हणून शिवसैनिक हाच पक्षाची खरी ताकद आहे. पक्ष ५0 वर्षांचा झाला. या प्रवासात पक्षाने अनेक चढ-उतार पाहिले. शिवसेनेत जाती-पातीचं, गटा-तटाचं राजकारण चालत नाही. म्हणून येणार्‍या काळात कोणीही गटातटाचं राजकारण न करता पक्ष वाढीसाठी व ह्यगाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिकह्ण या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला साथ देत पक्षासाठी काम करा, शिवसेना व शिवसैनिक हेच महत्त्वाचे, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख तथा खा. प्रतापराव जाधव यांनी शुक्रवार १९ जून रोजी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात केले. गर्दे वाचनालयाच्या सभागृहात शिवसेनेच्या पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या या मेळाव्यात व्यासपीठावर आ. डॉ. शशिकांत खेडेकर, आ. डॉ. संजय रायमुलकर, माजी आ. विजयराज शिंदे, तोताराम कायंदे, जिल्हा प्रमुख धिरज लिंगाडे, दत्ता पाटील, बाजर समिती संचालक जालींधर बुधवत, माजी जिल्हाप्रमुख ज्ञानदेव मानकर, महिला प्रमुख सिंधुताई खेडेकर, चंदाताई बढे, शांताराम जगताप, मुन्ना बेंडवाल, डॉ. प्रतापसिंग राजपूत, उपस्थित होते. या मेळाव्यात मनसेचे जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड, बुलडाण्याच्या माजी नगराध्यक्ष पूजाताई गायकवाड, जळगाव जामोदचे माजी नगराध्यक्ष गजानन वाघ व त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी खा. प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वात शिवसेनेत पुन्हा प्रवेश घेतला. खा. जाधव म्हणाले की, नुकत्याच झालेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रस्थापित नेत्यांना धूळ चारली. सारेच सहकारातील नेते एकत्र येऊनही आपण अनेक ठिकाणी सत्ता स्थापन केली. येणार्‍या काळात आता ग्रामपंचायत, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासून तयारी ठेवावी, असेही आवाहन खा. जाधव यांनी केले.