शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी कलाकारांना काम देऊ नये - नलावडे

By admin | Updated: October 9, 2016 01:55 IST

कान्हा चित्रपटातील अभिनेत्री गौरी नलावडे यांचे परखड मत.

बुलडाणा, दि. 0८- उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतातील चित्रपटात काम द्यायचे नाही, यामध्ये दोन मत प्रवाह आहेत. भारतात कोणत्याही प्रकारचा जातीभेद केल्या जात नाही. पंतप्रधान मोदी हे सुद्धा सर्वधर्म समभावाचे पुरस्कर्ते आहेत. पाकिस्तानी भारतामध्ये कलाकार म्हणून जगत असेल व तो भारताशी प्रामाणिक असेल, त्या कलाकाराला काम दिलेच पाहिजे. भारताशी गद्दारी करणार्‍या पाकिस्तानी कलाकाराला काम देऊ नये, कारण कलाकाराला कोणतीही जात नसते, असे परखड मत ह्यकान्हाह्ण चित्रपटातील अभिनेत्री गौरी नलावडे यांनी मांडले. बुलडाणा अर्बन व बीसीसीएनच्यावतीने सुरू असलेल्या गरबा फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी त्या ८ ऑक्टोबर रोजी बुलडाणा येथे आल्या असता, आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी बुलडाणा अर्बनचे कार्यकारी संचालक डॉ. सुकेश झंवर, बीसीसीएनचे संचालक सुधाकर अहेर, अँड. जितेंद्र कोठारी, सुधीर भालेराव यांची उपस्थिती होती. अभिनेत्री गौरी नलावडे म्हणाल्या, की मी विविध मराठी सिरिअलच्या माध्यमातून मराठी प्रेक्षकांसमोर आले. सैराटसारख्या चित्रपटामधून नागराज मंजुळे यांनी जे काही दाखविले आहे, ते वास्तव आहे. मुलांच्या भावना आई-वडील कशा दाबून ठेवतात, हे दाखविले. हेच मराठी प्रेक्षकांना आवडले. त्यामुळे मराठी चित्रपटाला चांगले दिवस आलेले आहेत. माधुरी दीक्षित ही माझी प्रेरणा असून, ती ज्याप्रमाणे जीवन जगते तसेच मलासुद्धा जगायला आवडते. तिने मराठी जोडीदार निवडला मी सुद्धा मराठी जोडीदार निवडणार आहे. मला गायलासुद्धा आवडते. आई व वडिलांच्या आशीर्वादाने क्षेत्रात पर्दापण केले. वास्तविक आई प्रोफेसर व वडील एअर फोर्समध्ये असतानासुद्धा मी या क्षेत्रामध्ये करिअर करते. निसर्गरम्य बुलडाणा शहरातील मराठी चित्रपटप्रेमींनी आवडणार्‍या कथेवर चित्रपट काढल्यास त्यात मी नक्की भूमिका करेल, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. प्रास्ताविक सुधीर भालेराव यांनी केले.