शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
3
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
4
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
5
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
6
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
7
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
8
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
9
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
10
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
11
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
12
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
13
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
15
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
16
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
17
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
18
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
19
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
20
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!

जिल्हा स्त्री रुग्णालय सहा महिन्यात कार्यान्वित होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 23:45 IST

बुलडाणा : ढिसाळ कारभारामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ठप्प झाली असून, सर्वसामान्यांची होणारी होरपळ लक्षात घेता बुलडाण्यातील स्त्री रुणालय सहा महिन्यांत कार्यान्वित करण्यात येईल.

ठळक मुद्देआ. सपकाळ यांच्या प्रश्नावर आरोग्यमंत्र्यांची माहितीजिल्हा सामान्य रुग्णालय व मोताळा येथील ग्रामीण रुग्णालयात वाढीव खाटांना मंजुरीसर्वसामान्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : ढिसाळ कारभारामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ठप्प झाली असून, सर्वसामान्यांची होणारी होरपळ लक्षात घेता बुलडाण्यातील स्त्री रुणालय सहा महिन्यांत कार्यान्वित करण्यात येईल. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय व मोताळा येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, वाढीव खाटांची मंजुरी देण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले.आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेच्या उत्तरात ते बोलत होते. वैद्यकीय अधिकाºयांची मोठ्या प्रमाणावरील रिक्त पदे, प्रसूतीसाठी महिला रुणांना अकोला व औरंगाबाद येथे संदर्भित करण्याचे वाढते प्रमाण, मुदतबाह्य औषधांचे वितरण, बंद पडलेली सिटी स्कॅन मशीन व लिफ्ट, रुग्णालयातील दलालांचे वाढते प्रस्थ इत्यादी विविध विषयांमुळे बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालय व एकूणच आरोग्य विभाग सध्या सर्वत्र चर्चेचा विषय झालेला आहे. नागरिकांच्या तक्रारीकडे शासन पातळीवर होणारे दुर्लक्ष लक्षात घेता, आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी १ आॅगस्ट रोजी विधानसभेत अर्धा तास चर्चेचा प्रस्ताव सादर केला होता. यावेळी बोलताना आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाची विदारक स्थिती सभागृहासमोर विशद केली. या चर्चेला उत्तर देताना आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी बुलडाणा येथील सामान्य रुग्णालय व मोताळा येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची वाढती संख्या लक्षणीय असल्याचे सांगून, या दोन्ही ठिकाणी वाढीव खाटांचा प्रस्ताव मंजूर करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच संस्थात्मक प्रसूतीचे महत्त्व लक्षात घेता, महिला रुग्णांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले स्त्री रुग्णालय सर्व सुविधांसह सहा महिन्यांत कार्यान्वित करण्यात येणार असल्याची शाश्वती दिली.जिल्हा शल्य चिकित्सकांची बदलीआरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभार व गलथानपणाबद्दल बोलताना डॉ. दीपक सावंत यांनी ही गंभीर बाब असून, जिल्हा शल्य चिकित्सकांची बदली करण्यात येत असल्याचे सभागृहास सांगितले.