शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजनच्या वाढीव मागणीचा जिल्ह्याधिकाऱ्यांनी केला प्रस्ताव सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:26 IST

चिखली : जिल्ह्यासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनच्या वाढीव मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने अन्न व औषधी प्रशासन आयुक्तांकडे सादर केल्याने जिल्ह्याला वाढीव ...

चिखली : जिल्ह्यासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनच्या वाढीव मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने अन्न व औषधी प्रशासन आयुक्तांकडे सादर केल्याने जिल्ह्याला वाढीव ऑक्सिजनचा पुरेसा कोटा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. जिल्ह्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकतेप्रमाणे जिल्हा प्रशासनाकडून मागणीच नसल्याने स्पष्ट करतानाच वाढीव ऑक्सिजनची मागणी नोंदविण्याबाबत आमदार श्वेता महाले यांनी एका पत्राद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

आमदार श्वेता महाले यांनी २२ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी, आयुक्त आणि बुलडाणा, अकोला व वाशिम जिल्ह्याचे प्रशासकीय समन्वयक यांच्याशी संपर्क साधून तसेच पत्र देऊन बुलडाणा जिल्ह्यासाठी ऑक्सिजनचा वाढीव कोटा मिळावा अशी मागणी केली होती. त्यावर जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी २४ एप्रिल रोजी जिल्ह्यासाठी ऑक्सिजनची मागणी एफडीए आयुक्तांकडे नोंदविली आहे. ऑक्सिजनची आवश्यकतेनुसार मागणीच नसल्याने जिल्ह्यात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झालेला होता. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात लागणाऱ्या ऑक्सिजनची मागणी प्रशासनाने केली होती; परंतु खाजगी दवाखान्यांना लागणाऱ्या ऑक्सिजनच्या मागणीची नोंदणीच केलेली नसल्याने अडचणीचा सामना करावा लागत होता. यापृष्ठभूमीवर खाजगी रुग्णालयांना लागणाऱ्या ऑक्सिजनच्या मागणीप्रमाणे नोंदणी करून पुरवठा करण्याची मागणी आ.महाले यांनी केली होती. दरम्यान, यानुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी एफडीएला दिलेल्या पत्रात देखील ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या एजन्सीजनी खाजगी दवाखान्यांचा ऑक्सिजन पुरवठा थांबविला असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच जिल्ह्यात आज रोजी ७ हजार ४१ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे खाजगी डीसीएच, डीसीएचसी यांना ऑक्सिजन पुरवठा पूर्ववत व पुरेसा करण्याबाबत कडक निर्देश संबंधित पुरवठादार एजन्सींना देण्याची विनंती देखील जिल्हाधिकारी यांनी एफडीए आयुक्तांकडे केली असून दैनंदिन रुग्णवाढ लक्षात घेता खाजगी दवाखाने, खाजगी डीसीएच व डीसीईसी यांना ८.०१ मे.टन तर शासकीय डीसीएच (डीसीईसीटी सीसीसी) यांना ६.५ असा एकूण १४.५१ मे.टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची विनंती देखील करण्यात आली आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गरज १३ मे.टनची, मिळते ६ मे.टन !

बुलडाणा जिल्ह्याला सद्य:स्थितीत शासकीय डीसीएच ३, शासकीय डीसीएचसी ६, शासकीय सीसीसी २४, खाजगी डीसीएच १२ तर खाजगी डीसीएचसी ३१ कार्यरत आहेत. शासकीय रुग्णालयात दररोज ४.४४ मे.टन तर मेट्रिक टन खाजगी दवाखान्यात ८.०१ मे.टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्याला केवळ ६ मे.टन एवढा ऑक्सिजन पुरवठा होत आहे.