येथील नगर परिषद शाळेतील शिक्षक मागील वर्षापासून पोलीस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून कोविड योद्धे म्हणून कार्य करीत आहेत. हे कार्य करीत असतानासुद्धा आपले काही सामाजिक दायित्व आहे, या भावनेतुन नगर परिषद उर्दू शाळेतील शिक्षक शे. असिफ शे. रशीद यांनी स्वखर्चातून शहरातील नागरिक, जीवनावश्यक वस्तू विक्री करणारे व्यवसायिक, कोविड योद्धे यांना दोन हजार मास्कचे वाटप केले. येथील पोलीस स्टेशनचे ठाणेदार आत्माराम प्रधान, मुख्याधिकारी सचिन गाडे यांच्या हस्ते मास्क वितरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कोविड योद्धे म्हणून कार्य करणारे शिक्षक केशव गिऱ्हे, रामेश्वर सरकटे, गजानन नागरे, शे. सलीम शे. चाँद, वकार अहेमद शेख लियाकत, शे. आसिफ शे. रशिद तथा पोकाॅ मोहन राठोड आदी उपस्थित होते.
दोन हजार मास्कचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:34 IST