ओमप्रकाश देवकर / बुलडाणासधन कृषी पद्धतीत रासायनिक खतांच्या अनिर्बंंंध वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे. त्याचा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. मृद् आरोग्य अबाधित राखण्यासाठी मृदा तपासणीने प्रमाणित केलेल्या अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार खतांच्या संतुलित तसेच परिणामकारक वापरास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. कृषी विभागामार्फत यासाठी मृदा त पासणी कार्यक्रम राबविला जात असून, गतवर्षी ३0 हजार ९३६ माती नमुन्यांची तपासणी करण्यात आली. सन २0१५-१६ मध्ये बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ४४ हजार १९५ मृदा आरोग्यपत्रिकांचे वितरण करण्यात आले आहे. ज्या मातीच्या जिवावर पिके घेतो, त्या जमीन आणि मातीची गुणवत्ता त पासणीची काळजी मात्र शेतकरी घेत नाहीत. माती परीक्षणाबाबत शेतकर्यांमध्ये कमालीची उदासीनता दिसून येत आहे; मात्र याचे परिणाम वर्षानुवर्षे जमिनीला सोसावे लागत आहेत. आपण उत्पादन घेतो, ती जमीन नेमकी कशी आहे, ितचा दर्जा कसा आहे, उत्पादन करण्याइतका कस तिच्यात राहिला आहे का, तो राहिला नसेल तर त्याची कारणे काय आणि त्यावर उपाय काय, असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांबाबत शेतकर्यांमध्ये जाणीव जागृती व्हावी, यासाठी केंद्र शासनाने मृदा आरोग्यपत्रिका अभियान हाती घेतले आहे. या अभियानातून माती नमुने तपासून त्याचा आराखडा तयार केला जातो. या आराखड्यानुसार कृषिसेवक, कृषी सहायक हे बागायत आणि जिरायत क्षेत्रातील मातीचे नमुने जीपीएस उपकरणाच्या साहाय्याने नोंदवून घेत आहेत. सन २0१५-१६ मध्ये जिल्ह्यातून ३0 हजार ९३६ माती नमुने तपासणी करण्यात आली आहे. तर १ लाख ४४ हजार १९५ मृदा आरोग्यपत्रिकांचे वितरण करण्यात आले आहे.
लाखो मृदा आरोग्यपत्रिकांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2016 02:18 IST