शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

आपत्तीग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित

By admin | Updated: May 5, 2015 00:07 IST

बुलडाणा जिल्ह्यातील १0२ बाधित गावे मदतीपासून वंचित.

मनोज पाटील / मलकापूर: नोव्हेंबर ते मार्च दरम्यान झालेल्या नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यात जिल्ह्यातील १0२ बाधित गावातील शेतकर्‍यांना प्रशासनाने नोंदविलेल्या मागणीनुसार अद्यापपावेतो अनुदान प्राप्त झाले नसल्याने तब्बल १२४0 बाधित शेतकरी अनुदानापासून वंचीत आहेत. तर एप्रिल महिन्यातील नुकसानीचे सर्व्हेक्षण सुरू असून ६१६ बाधित गावातील प्राथमिक नुकसानीचे क्षेत्रफळ ७७४९ हेक्टर काढण्यात आले आहे. या वस्तुस्थितीदर्शक पंचनाम्यानुसार या क्षेत्राचा संयुक्त अहवाल शासनास सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे. पुर्वीचे प्रलंबित अनुदान व आताच्या अहवालानुसारचे अनुदान शेतकर्‍यांना मिळालेच नसल्याने जिल्ह्यातील हजारो बाधित शेतकरी आजही पीक नुकसानीचे अनुदान मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत.नोव्हेंबर ते डिसेंबर १४ दरम्यान मोताळा तालुक्यातील ३ गावांना अतवृष्टी व वादळी पावसाचा तडाखा बसला. या तडाख्यात २३ शेतकरी बाधित झाले. या शेतकर्‍यांच्या केळी पिकांचे नुकसान ५0 टक्क्यापेक्षा अधिक झाले. या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाने नैसर्गिक विभागाकडे पाठविले आहेत. तर डिसेंबर २0१४ ते जानेवारी २0१५ दरम्यान अवेळी पाऊस, वादळ व गारपीटीने बुलडाणा, खामगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, मेहकर व मोताळा तालुक्यातील २५ गावे बाधित झाली. या गावातील १00२ बाधित शेतकरी असून मार्च महिन्यातील वादळी पाऊस व गारपीटीच्या तडाख्यात बुलडाणा, मलकापूर, जळगाव जामोद व मेहकर या तालुक्यातील ७४ गावे बाधित होवून २१५ शेतकरी बाधित झाले. ४ फेब्रुवारी २0१५ च्या शासन निर्णयानुसार एकुण ७५.३0 लक्ष रूपयांची तर १४ एप्रिल २0१५ च्या शासन निर्णयानुसार १६ लाख ९५ हजार ८५0 रूपये अनुदान मागणी जिल्हा नैसर्गिक आपत्ती विभागाने शासनस्तरावर नोंदविली आहे.