शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

दिंडी मार्गावर भाविकांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:08 IST

खामगाव : विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांच्या पालखीचे रविवारी खामगाव येथून शेगावकडे प्रस्थान झाले. विदर्भ माउलीला निरोप देण्यासाठी एकच गर्दी उसळल्याने, दिंडी मार्गावर भाविकांचा मळा फुलल्याचेच चित्र दिसून आले.

ठळक मुद्देश्रींच्या पालखीचे रजतनगरीत भावपूर्ण स्वागत

अनिल गवई।लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांच्या पालखीचे रविवारी खामगाव येथून शेगावकडे प्रस्थान झाले. विदर्भ माउलीला निरोप देण्यासाठी एकच गर्दी उसळल्याने, दिंडी मार्गावर भाविकांचा मळा फुलल्याचेच चित्र दिसून आले.भगवान विठ्ठलाचे आषाढी एकादशीला दर्शन घेऊन ही पालखी परतीच्या मार्गाला लागली. दरम्यान, दोन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर श्रींची पालखी शनिवारी सकाळी खामगावात पोहोचली. या ठिकाणी पालखीचे मनोभावे स्वागत करण्यात आले.मुक्कामी असलेल्या पालखीतील वारकºयांना श्रद्धेचा निरोपही देण्यात आला. दरम्यान, रविवारी पहाटे ५ वाजता श्रींची पालखी शेगावकडे मार्गस्थ झाली. तत्पूर्वीच खामगाव आणि परिसरातील हजारो नागरिक, भाविक शेगावकडे निघाले होते. खामगाव आणि परिसरच नव्हे, तर, नांदुरा, मलकापूर, चिखली, उंद्री, सिंदखेड राजा, बुलडाणा येथील भाविक खामगावात दाखल झाले. आपली वाहने खामगावात ठेवून, अनेक भाविकांनी दिंडी मार्गावरून माउलींसोबत पायी वारी केली. यामध्ये दिंडी मार्गावर पहिला भाविक पहाटे ४.२३ मिनिटांनी निघाला. त्यानंतर टप्प्याने भाविकांच्या गर्दीत वाढ झाली. शिवराज फॉर्म येथे खा. प्रतापराव जाधव, संतोषसेठ डिडवाणीया, दत्ता पाटील, सुनील अग्रवाल, संजय अवताडे, सुरेश वावगे यांच्यासह शिवसेना पदाधिकाºयांनी पालखीचे स्वागत केले. सकाळी ७.४५ वाजता भाविकांचे एक टोक शेगावात, तर दुसरे टोक खामगावात होते. संत गजानन महाराजांची पालखी १०.३० वाजता जवाहर नवोदय विद्यालयाजवळ पोहोचली. या ठिकाणी असलेल्या उंच लोखंडी पुलावरून श्रींच्या पालखीसह वारकºयांवर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला. सर्वात शेवटचा भाविक दुपारी १.५५ वाजता शेगावात पोहोचला.काही बालकांनी आपल्या वडिलांच्या खांद्यावर, तर काहींनी चक्क आई-मावशीने केलेल्या चादरीच्या पाळण्यातून वारी केली. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. खामगाव-शेगाव या राज्य मार्गावरील वाहतूक पहाटे ३ ते दुपारी ३ वाजेपर्यंत बंद होती. दुपारी ३.४२ वाजतानंतर शेगाव येथून खामगावसाठी वाहतूक सुरळीत झाली.दिंडी मार्गावरील गर्दीचा उच्चांक!श्रींची पालखी शेगावकडे मार्गस्थ झाल्यानंतर खामगाव येथून शेगावकडे जाणाºया भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मंगळवारीही वाढत्या गर्दीच्या उच्चांकाचा प्रत्यय अनेक भाविकांना आला. गेल्या काही वर्षांपासून भाविकांच्या संख्येत सारखी भर पडत असल्यामुळे दिंडी मार्गही अरुंद जाणवतो. परिणामी अनेक भाविकांना गर्दीचा त्रास होतो. पालखीसोबत चालत असताना, वाट काढणेही कठीण होऊन जाते. गर्दीमुळे काही भाविक दिंडी मार्गाच्या समांतर असलेल्या शेतातील पाऊलवाटेने संतनगरीत दाखल झाले.