शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

दुय्यम निबंधक कार्यालयाचा कारभार ढेपाळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 11:35 IST

Khamgaon News : रिक्त झालेल्या जागेवर अद्यापही दुसरे दुय्यम निबंधक रुजू झालेले नाहीत.

खामगाव : येथील वादग्रस्त दुय्यम निबंधक अनिल पवार(श्रेणी-१) यांच्या रिक्त झालेल्या जागेवर अद्यापही दुसरे दुय्यम निबंधक रुजू झालेले नाहीत. परिणामी, उपदुय्यम निबंधक (श्रेणी-२) कार्यालयावरील ताण वाढला असून, अनेक खेरदी रखडल्याने शेतकरी आणि सामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात जास्त खरेदी-विक्रीच्या व्यवहारामुळे खामगाव येथे श्रेणी-१ आणि श्रेणी-२ दुय्यम निबंधक कार्यालये कार्यान्वित करण्यात आली आहे. दरम्यान, कधी कनेक्टिव्हिटी नसल्याने, तर कधी दुय्यम निबंधकांच्या गलथान कारभारामुळे खामगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालये नेहमीच चर्चेत असतात. , शासकीय जमिनीचे मूल्य कमी करून, खरेदी नोंदणी प्रकरणात अडचणीत सापडलेल्या दुय्यम निबंधक अनिल पवार यांनी विनंतीवरून मेहकर येथे बदली करून घेतली आहे. पवार यांच्या बदलीनंतर दुय्यम निबंधक कार्यालय येथील कामकाज ठप्प झाले आहे. 

शंभरावर खरेदी नोंदणी रखडल्या!  तांत्रिक अडचण आणि दुय्यम निबंधकांच्या नियुक्तीमुळे बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक खरेदी विक्रीचे व्यवहार होणाऱ्या खामगाव शहरातील शंभरावर व्यवहारांची खरेदी नोंद रखडल्याची चर्चा आहे.

श्रेणी-२ दुय्यम निबंधक कार्यालयाचा ताण वाढला!  दुय्यम निबंधक नसल्याचा फटका शेतकरी आणि खरेदी खत नोंदणी करणाऱ्यांना बसत आहे.   श्रेणी-२ उपदुय्यम निबंधक कार्यालयावरील ताण वाढल्यामुळे शेतकरी आणि बाहेरगावच्या नागरिकांना चांगलीच प्रतीक्षा करावी लागतेय. 

टॅग्स :khamgaonखामगाव