शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

उप जिल्हा रुग्णालयाला रिक्त पदांचे ग्रहण

By admin | Updated: July 4, 2017 00:14 IST

मलकापूर : येथील उपजिल्हा रुग्णालयाला रिक्त पदांचे जणुकाही ग्रहणच लागले आहे. त्यांचा भरणा बऱ्याच दिवसांपासून नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : येथील उपजिल्हा रुग्णालयाला रिक्त पदांचे जणुकाही ग्रहणच लागले आहे. त्यांचा भरणा बऱ्याच दिवसांपासून नाही. परिणामी आरोग्य सेवा विस्कळीत होऊन दिवसाकाठी येणारे शेकडो रुग्ण वाऱ्यावर पडण्याची शक्यता आहे. आरोग्य विभागाने त्याकडे लक्ष देण्याची गरज या निमित्ताने निर्माण झाली आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की, मलकापूर व परिसरातील हजारो नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी, या दृष्टिकोनातून शासनाच्यावतीने येथे सुसज्ज अशा उपजिल्हा रुग्णालयाची उभारणी केली. मात्र, उपजिल्हा रुग्णालय सतत या ना त्या कारणावरुन चर्चेचा विषय ठरत आहे.विद्यमान परिस्थितीत रिक्त पदांचा भरणा गेल्या कित्येक दिवसांपासून करण्यात आला नसल्याने, उपजिल्हा रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आलेय. या संदर्भात माहिती घेतली असता वर्तमान स्थितीत सहायक अधीक्षक १, वरिष्ठ लिपिक १, कनिष्ठ लिपिक १, औषधी निर्माण अधिकारी २, स्टाफ नर्स ३ व वैद्यकीय अधिकारी ३ अशी पदे कित्येक दिवसांपासून रिक्त असल्याचे सांगण्यात आले. महत्त्वाचा विषय असा, की वैद्यकीय अधिकाऱ्यांची ८ पैकी ५ पदे भरण्यात आली असली, तरी त्यात प्रत्यक्ष सहभागी किती जणांचा राहतो हा मुद्दा महत्त्वाचा आहे. एकीकडे कार्यालयीन कामकाजावर रिक्त पदाचा परिणाम होत असून, दुसरीकडे त्यामुळे आरोग्य सेवाही प्रभावित झाल्याचे दिसत आहे. रिक्त पदांमुळे निश्चित आरोग्य सेवा व कार्यालयीन कामकाज प्रभावित झाले आहे. त्याकरिता पाठपुरावा केला आहे. त्यावर कारवाईची प्रतीक्षा आम्हाला आहे.- डॉ. अमोल नाफडेवैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय, मलकापूर