शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्ष, नगरसेवकांविरुद्ध सानंदांकडून मानहानीची नोटिस

By admin | Updated: April 28, 2017 00:45 IST

खामगाव : नगर परिषदेच्या २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सभेमध्ये ठराव क्र.२३ नियम व कायद्याची पायमल्ली करीत गैरकायदेशीर पारीत केला आहे.

पालिकेत खळबळ : मुख्याधिकाऱ्यांचाही समावेशखामगाव : नगर परिषदेच्या २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सभेमध्ये ठराव क्र.२३ नियम व कायद्याची पायमल्ली करीत गैरकायदेशीर पारीत केला आहे. सदर ठरावामध्ये बदनामीकारक मजकुर नमूद केल्याचा आरोप करीत माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी खामगाव पालिकेतील नगराध्यक्षांसह सत्ताधारी नगरसेवक व मुख्याधिकारी यांना मानहानीची नोटीस बजावली आहे. सर्वाधिक खपाच्या वृत्तपत्रांमध्ये बिनशर्त जाहीर माफी मागावी. अन्यथा सर्वांविरूध्द २ कोटी रूपयांचा अब्रु नुकसानीचा दावा न्यायालयात दाखल करण्यात येईल. असा इशारा नोटीसमधून देण्यात आला आहे. पालिकेच्या २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सभेत शिवाजी व्यायाम मंदीर संदर्भातील ठराव पारीत करण्यात आला. या सभेमध्ये झालेल्या चर्चेची वस्तुस्थिती न लिहिता बदनामी होईल या उद्दिष्टाने एक ते दीड महिन्यानंतर सदर सभेचे कार्यवृत्त गैरकायदेशीररित्या नोंदविले आहे. अत्यंत चुकीच्या पध्दतीने व बेकायदेशीरपणे राजकीय दबावाखाली नोटीस घेणाऱ्यांनी नियमाची पायमल्ली करण्यास मदत केली असा आरोप नोटीसमध्ये करण्यात आला आहे. २८ फेब्रुवारी रोजीच्या सभेतील ठराव हा चुकीचा असून त्यामध्ये चारित्र्यावर शिंतोडे उडविण्यात आले आहेत. वास्तविक वरील विषयातील कायदेशीर बाजु व परिस्थितीसापेक्ष बाजु समजून घेऊन नियमांचे पालन करून साधक-बाधक चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र नगराध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह सत्ताधारी नगरसेवक सोबतच मुख्याधिकारी यांनी मुळ दस्तावेजाचे अवलोकन न करता सत्य, असत्य पडताळून न पाहता केवळ राजकीय आकसापोटी बेकायदेशीर चर्चा करून खोटे आरोप लावत बदनाम केल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. या नोटीसमुळे नगर पालिकेत खळबळ उडाली असून सत्ताधाऱ्यांनी या नोटीसला प्रत्त्युत्तर म्हणून कायदेशीर कारवाईचा मार्ग स्वीकारल्याची माहिती आहे.माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांची नोटिस पालिकेला प्राप्त झाली आहे. या विरोधात न्यायालयीन लढा देण्यास आपली तयारी आहे. तथापी, ही नोटिस म्हणजे पालिकेवर दबाव आणण्याची खेळी आहे.- अनिता डवरे,नगराध्यक्षा खामगाव