शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

गावठी दारू अड्डे पोलिसांकडून उद्ध्वस्त

By admin | Updated: June 22, 2015 02:05 IST

दहा हजारांची दारू केली नष्ट; ग्रामीण भागात कारवाई नाही.

बुलडाणा : मुंबईतील मालवणी येथे घडलेल्या दारूकांडानंतर पोलीस विभागाने अवैध दारू अड्डय़ावर छापे मारून दारू अड्डे उद्ध्वस्त करण्याचा सपाटा सुरू केला आहे. बुलडाणा येथे पोलिसांनी गावठी दारू अड्डय़ावर छापे टाकून १0 हजारांची दारु जप्त करून ती नष्ट केली तसेच दारूचे अड्डेही उद्ध्वस्त केले. बुलडाणा शहर व परिसरात मोठय़ा प्रमाणात गावठी दारूच्या हातभट्टय़ा बाराही महिने सुरू असतात. बाराही महिने येथे दारूचा महापूर वाहतो. विशेष म्हणजे, हे व्यवसाय स्वत:ला नेते म्हणविणार्‍या अनेक महाभागांचे आहेत. पोलीस प्रशासनाच्या ह्यआशीर्वादाह्णने हे धंदे चालतात. या गावठी दारूपायी अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, आजही होत आहे. पोलिसांनी शनिवारी भिलवाडा आणि सुंदरखेड येथील विविध ठिकाणच्या गावठी दारू अड्डय़ांवर धाडी टाकल्या. यावेळी पोलिसांनी गावठी दारूची विक्री करणार्‍या एका इसमासह बारा महिलांविरुद्ध गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून ९ हजार ८६0 रुपये किमतीची २१५ लीटर दारू जप्त केली आहे. या धडक कारवाईमुळे गावठी दारूविक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी ही कारवाई केली. शहरातील भिलवाडा व सुंदरखेड येथे सुरू असलेल्या गावठी दारू अड्डय़ावर पोलिसांनी धाडी टाकल्या. पोलिसांनी भिलवाडा व सुंदरखेड येथील सिंधू काकडे, सुनीता गायकवाड, मिनल गायकवाड, निर्मला गायकवाड, सुमित्रा ठाकरे, सिंधू बरडे, चंदा मोरे, सुमन गायकवाड, प्रतिभा बरडे, लीला मोरे, मारुती बरडे व विमल बरडे यांना दारूविक्री करताना पकडले. त्यांच्याकडून ९ हजार ८६0 रुपये किमतीचा २१५ लीटर दारूसाठा जप्त केला आहे. आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमध्ये शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण तांदळे, सहायक पोलीस निरीक्षक ठाकूर, उपनिरीक्षक गोरे, गजानन सातव, तारकसे, दिलीप पवार, चिंचोले, घोते, निकम, हिंगे, ज्योती मोरे, मीनाक्षी मोरे व म्हात्रे या पोलीस कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला होता. एकाच दिवशी पोलिसांनी दोन ठिकाणी गावठी दारूअड्डय़ावर धाडी टाकल्यामुळे मद्यविक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे