शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

दोन चिडीमारांसह महिलेवर दामिनी पथकाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:05 IST

जिल्हा महिला दक्षता पथकाने (दामिनी पथक) ३१ जुलै रोजी शहरात धडक कारवाई करीत दोन चिडीमारांसह एक महिला व वाहन ताब्यात घेतले. दामिनी पथकातील महिला पोलीस रणरागिणी झाल्याने रोडरोमिओंना चाप बसला आहे.

ठळक मुद्देरोडरोमिओंच्या संख्येत प्रचंड वाढ कारवाईने रोडरोमिओंना बसला चाप साध्या वेशात टेहळणी करून गस्त घातली

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : सध्या शहरातील महाविद्यालये, धार्मिक स्थळे, प्रमुख बाजारपेठ आदी भागात युवती व महिलांच्या छेडछाडीच्या घटना वाढल्या आहेत. त्यातच महाविद्यालयीन युवावर्गामध्ये शिक्षणाऐवजी दुसरेच उद्योग सुरू आहेत. तसेच रोडरोमिओंच्या संख्येतही प्रचंड वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा महिला दक्षता पथकाने (दामिनी पथक) ३१ जुलै रोजी शहरात धडक कारवाई करीत दोन चिडीमारांसह एक महिला व वाहन ताब्यात घेतले. दामिनी पथकातील महिला पोलीस रणरागिणी झाल्याने रोडरोमिओंना चाप बसला आहे.महिला आणि मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी महिला छेडछाड प्रतिबंधक पथकाची स्थापना केली आहे. या पथकांकडून सार्वजनिक ठिकाणे आणि महाविद्यालय परिसरात प्रबोधनासोबतच रोडरोमिओंवर कारवाईही सुरू करण्यात आली आहे. ‘दामिनी पोलीस पथक’ असे या पथकाचे नाव आहे. या पथकातील पाच महिला पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी बाबूराव महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ जुलै रोजी शहरातील आठवडी बाजाराचा दिवस तसेच श्रावण सोमवार पाहता शहरातील महाविद्यालये, धार्मिक स्थळे, बसस्थानक व आठवडी बाजार आदी परिसरात महिला व मुलींची छेडझाड होणाºया ठिकाणांवर साध्या वेशात टेहळणी करून गस्त घातली. यादरम्यान स्थानिक श्री शिवाजी शाळेच्या पाठीमागे असलेल्या गणपती मंदिराजवळ चिडीमारी करणाºया सुरेश परशराम तुपकर (वय ४०) रा.साखरखेर्डा, व त्याचे वाहन इंडिका व्हिस्टा क्र.एम.एच. २८-व्ही ६५९८ सह अतुल भीमराव जाधव (वय २२) व सावरगाव डुकरे येथील एका महिलेला ताब्यात घेऊन कलम ११०, १७ अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई केली असल्याची माहिती दामिनी पथकाच्या प्रमुख लीला इंगळे यांनी दिली. या दामिनी स्कॉडमध्ये बुलडाणा पोलीस नियंत्रण कक्षातील महिला पोलीस लीला इंगळे, मनापोकॉ संगीता सोरमारे, रेखा डोंगरदिवे, मपोकॉ रेखा मात्रे, अंजली जाधव व वाहन चालक सैय्यद नसीम यांचा समावेश आहे.चिखलीत प्रथमच झाली कारवाईदामिनी पथकाच्या स्थापनेनंतर शहरात प्रथमच ही कारवाई झाली असून, यापुढेही अशीच कारवाई सुरू राहणार असल्याने रोडरोमिओंना चांगलाच चाप बसला आहे. अशा कारवार्इंमुळे महिला व युवतींच्या छेडछाडीचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, कुठेही छेडछाडीची घटना होत असेल, तर विद्यार्थिनींनी व महिलांनी निसंकोचपणे आपल्याशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन चिखलीचे ठाणेदार महेंद्र देशमुख यांनी केले आहे.