शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कपाशी सुकू लागली!

By admin | Updated: July 31, 2014 01:26 IST

जामोद परिसरातील चित्र : शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण.

जामोद : जामोद परिसरातील अनेक शेतकर्‍यांच्या शेतातील उभे कपाशीचे पीक अचानक सुकू लागले आहे. यामुळे शेतकरी वर्ग धास्तावला असून संबंधित कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त होत आहे.परिसरातील अनेक शेतकर्‍यांनी पाऊस येण्यापूर्वीच धुळ पेरणी केली. काही शेतकर्‍यांनी ठिंबक सिंचनावर कपाशीची पेरणी केली. मात्र, तब्बल दीड महिना पावसाळा लांबल्यामुळे धुळ पेरणी केलेल्या शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले. तर ठिंबक सिंचनावर कपाशी पेरणी केलेल्या शेतकर्‍यांना विहिरीचे पाणी कमी पडले. अशाही परिस्थितीत शेतकर्‍यांनी जीवापाड मेहनत करीत पिके जगविली. पंरतु, आता ही पिकेही सडू लागल्यामुळे परिसरातील अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेकांच्या शेतातील वाढलेली कपाशी मोठी झाल्यानंतर तिला सडवा लागला आहे. त्यामुळे अस्मानी संकटात हे शेतकरी सापडले असून जामोद परिसरातील अनेक शेतकर्‍यांसह जगन्नाथ गोविंदा हिस्सल, राजु बांधीरकार, दीपक बांधीरकार यांच्या शेतातील हिरवी कपाशी सुकू लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ही बाब संबधीत शेतकर्‍यांनी कृषी विभागाला कळविली. त्यानुसार कृषी अधिकारी राऊत, मंडळ कृषी अधिकारी इंगळे, कृषी विज्ञान केंद्राचे कृषीतज्ज्ञ उमाळे, कृषी सहाय्यक शेगोकार, तलाठी श्रीनाथ यांनी पाहणी केली. गत वर्षापासून शेतकर्‍यांवर अस्मानी तसेच सुलतानी संकटांची मालिकाच सुरू आहे. गारपीट, अतवृष्टी यामुळे पिकांना फटका बसत असल्यामुळे प्रचंड अशा आर्थिक संकटात शेतकरी सापडला आहे. यासंदर्भात जगन्नाथ हिस्सल यांनी तहसीलदार जळगाव जामोद यांना त्वरीत नुकसान भरपाई मिळावी, यासाठी निवेदन सादर केले असता दीड महिन्याच्या उघडीपनंतर अचानक २२ ते २४ जुलै दरम्यान अतवृष्टी झाली. त्यानंतर आलेल्या वेगवान वार्‍यामुळे कपाशीच्या मुळाने सड धरली असल्याचे मत कृषी अधिकारी किशोर राऊत यांनी व्यक्त केले.