ठळक मुद्देशुल्लक कारणावरून मारहाणगयाबाई मोहिते या महिलेने अमडापूर पो.स्टे.ला दिली तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्कअमडापूर : हरणी येथे शुल्लक कारणावरून मारहाण झाली असून, याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.गयाबाई आश्रु मोहिते रा.हरणी या महिलेने अमडापूर पो.स्टे.ला तक्रार दिली की, ३० जुलै रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास आरोपी हरिदास मोहिते, देवीदास मोहिते, धनराज मोहिते, दुर्गेश मोहिते, राजेश मोहिते, कौसाबाई मोहिते, बाली देवीदास मोहिते, राजूबाई मोहिते व छबु बाबूलाल मोहिते यांनी मारहाण केली. तक्रारीवरून कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हे दाखल करून पुढील तपास ए.एस.आय मोतीलाल लोटन, सुनील चौधरी हे करीत आहेत.