शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

कोविड लसीकरण: माहिती देऊनही अ‍ॅपमध्ये नावांचा समावेश नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 11:31 IST

Corona Vaccine कोविन अ‍ॅपमध्ये तांत्रिक बिघाड असून, अनेक कर्मचाऱ्यांच्या नावांचा समावेश अजूनही अ‍ॅपमध्ये झाला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : बुलडाणा जिल्ह्यात कोविड लसीकरणाला सुरुवात होऊन महिनाभराचा कालावधी लोटला असून, अद्यापही २० टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांची नावे कोविन अ‍ॅपमध्ये समाविष्ट झाली नसल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. सूत्रांच्या माहितीनुसार, कोविन अ‍ॅपमध्ये तांत्रिक बिघाड असून, अनेक कर्मचाऱ्यांच्या नावांचा समावेश अजूनही अ‍ॅपमध्ये झाला नाही. त्यामुळे पात्र असूनही यादीत नाव नसल्याने लस मिळू शकली नाही, अशी खंत आरोग्य कर्मचाऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.कोविड लसीला मान्यता मिळाल्यानंतर ही लस सर्वप्रथम वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह कोरोनाकाळात जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या फ्रंटलाईन कर्मचात्यांना समर्पित करण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेच्या पहिल्याच टप्प्यात याच कर्मचान्यांना लस दिली जात आहे. तत्पूर्वी आरोग्य विभागातील सर्वच पात्र कर्मचाऱ्या कोविन अ‍ॅपमध्ये नाव समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यासाठी कर्मचाºयांकडून माहितीदेखील मागविण्यात आली होती. लसीकरणाला सुरुवात होऊन एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला; मात्र अजूनही जवळपास २० टक्के कर्मचाºयांची नावे कोविन अ‍ॅपमध्ये समाविष्ट झालेली नाहीत. त्यामुळे अद्यापही या कर्मचाºयांना लस मिळू शकली नाही. जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून यामध्ये आरोग्य विभागातील कर्मचाºयांचाही समावेश आहे. अशा परिस्थितीत इतरांसोबतच उर्वरित आरोग्य कर्मचाºयांना लस मिळणे अपेक्षित आहे.२० दिवसांपासून कोविन अ‍ॅपचा गोंधळ कोविड लसीकरण मोहिमेसाठी उपयोगात आणल्या जाणाचा कोविन अ‍ॅपमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याची माहिती आहे. मागील २० दिवसांपासून ही तांत्रिक अडचण सुरु असल्याची माहिती आहे. कोविन लसीसाठी पात्र ठरल्यानंतर या कर्मचाºयांनी त्यांची माहिती संबंधित यंत्रणेला दिली. परंतु, लसीकरणाच्या लाभार्थी यादीत अद्यापही त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला नसल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. 

आरोग्य कर्मचाऱ्यांना वाढला कोविडचा धोका जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीतही आरोग्य विभागातील कर्मचारी रुग्णसेवा देत आहेत. असे असतानाही आतापर्यंत अनेकजणांना लस मिळाली नाही. त्यामुळे अशा कर्मचायांसाठी कोरोनाचा धोका अधिक वाढल्याचे चित्र दिसून येते.

खामगावातील निमा सदस्य वंचित!खामगाव शहरातील राष्ट्रीय एकीकृत मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी कोविड-१९ लसीकरणासाठी नगर परिषद रूग्णालयाकडे नावे नोंदविली. नगर परिषद रूग्णालयाकडून ही नावे जिल्हा स्तरावर पाठविण्यात आलीत. मात्र, महिना लोटल्यानंतर देखील निमाच्या सदस्यांची नावे कोविन अ‍ॅपमध्ये  समाविष्ट झाली नसल्याचे समजते.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसkhamgaonखामगाव