शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्ग प्रकरणी न्यायालयाची सरकारला नोटीस

By admin | Updated: April 6, 2017 23:23 IST

लोणार : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाला बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर आव्हान दिले आहे.

शेतकऱ्यांनी दाखल केली याचिका : ५ एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे आदेश लोणार : नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाला बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर आव्हान दिले आहे. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव, अमरावती विभागीय आयुक्त, बुलडाणा जिल्हाधिकारी आणि राज्य रस्ते महामंडळाला ७ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिले आहेत.सिंदखेडराजा तालुक्यातील सदानंद अर्जुन वाघमारे व शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. याचिकाकत्यार्नुसार, समृद्धी महामार्गाकरिता किनगाव राजा, हिवरखेड पूर्णा आणि राहेरी खुर्द या गावातील जमीन संपादित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्याकरिता भूसंपादनाची अधिसूचनाही काढण्यात आली. समृद्धी महामार्गाकरिता लागणारी जमीन ही आदिवासी गावातील आहे. त्यामुळे पेसा कायद्यातील तरतुदीनुसार भूसंपादनाकरिता संबंधित ग्रामपंचायतीची परवानगी मिळणे आवश्यक आहे. परंतु, कायद्यातील तरतुदीनुसार कोणतीही परवानगी न घेताच अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यासोबतच केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या भूसंपादन कायद्यानुसार शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊ केलेला नाही. त्यामुळे भूसंपादनाच्या अधिसूचनेवर हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. मात्र, त्या हरकतींवर कोणतीही सुनावणी घेण्यात आलेली नाही, असा दावा याचिकेत केला आहे. आदिवासी गावातील जमिनी राज्य सरकार परस्पर संपादित करू शकत नाही. त्यामुळे या भूसंपादनाच्या प्रक्रियेला स्थगिती द्यावी, शेतकऱ्यांना दाखल केलेल्या हरकतींवर सुनावणी करण्यात यावी आणि नव्या भूसंपादन कायद्यानुसार योग्य मोबदला आणि पुनर्वसनाचे पॅकेज देण्यात यावे, अशी विनंती याचिकेत केली आहे. त्यावर राज्य सरकारला ७ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. विक्रम उंदरे, अ‍ॅड. विक्रांत मापारी, अ‍ॅड. मिलिंद काकडे आणि अ‍ॅड. विश्वेश्वर पठाडे यांनी बाजू मांडली.