शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शेगाव तालुक्यात कापसाचा पेरा वाढला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:07 IST

१४ हजार ५० हेक्टरवर कापूस, तर ८ हजार २० हेक्टरवर सोयाबीन

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : तालुक्यात यावर्षी सर्वात जास्त कापसाचा पेरा झाला आहे. यावर्षी सोयाबीन पिकाला शेतकरी वर्गाने दुसऱ्या क्रमांकाची पसंती दर्शविली आहे. तालुक्यात कापसाचा पेरा हा १० हजार ५० हेक्टर, तर सोयाबीन ८ हजार २० हेक्टर झाला आहे. शेतकऱ्यांना चांगल्या दमदार पावसाची आवश्यकता आहे. तालुक्यात ३७ हजार ७२० हेक्टर पेरणी आटोपली आहे.तालुक्यात यावर्षी पेरणीला सुरुवात लवकर झाली. जवळपास ८० टक्क्यांच्यावर आजमितीला पेरण्या आटोपल्या आहेत. गत दोन ते तीन वर्षांत तालुक्यात सोयाबीन पिकांचा पेरा हा सर्वात जास्त प्रमाणात होता; पण शेतकरी वर्ग हा आता पुन्हा कपाशी पिकाकडे वळला आहे. म्हणजे यावर्षी सोयाबीन पीक हे कमी प्रमाणात तर कपाशीच्या उत्पादनात वाढ होणार आहे. तालुक्यात तीन दिवसांपासून बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे बऱ्याच भागात शेतीची फवारणीची, निंदणाची कामे सुरू आहेत. अशीच पावसाने हजेरी लावली तर तालुक्यात शेतकरी वर्गाने पेरलेल्या पिकांना संजीवनी मिळण्यासारखे होईल. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट हे शेतकऱ्यांवर येणार नाही. महागडे बियाणे विकत घेऊन शेतकऱ्यांनी शेतात पेरण्या केलेल्या आहेत. त्या पिकांना आतो वाढ मिळत आहे. शेतात मजुरांच्या हाताला काम मिळत आहे. काही ठिकाणी मजूर मिळत नसल्याचे चित्र आहे. यावर्षी तालुक्यात कपाशी पेरा सरासरी पेरणी क्षेत्र १४ हजार ५० हेक्टर, सोयाबीन ८ हजार २० हेक्टर, मूग २४०० हेक्टर पेरणी केले. क्षेत्र उडीद ६६५० हेक्टर, तूर ३००० हेक्टर, ज्वारी ५०० हेक्टर, बाजरी २०० हेक्टर, मका ४०० हेक्टर, तीळ २०० हेक्टर व इतर समावेश आहे. एकूण ३५ हजार ७२० हेक्टर पेरणी आटोपली आहे. भाव नसल्याने सोयाबीनकडे शेतकऱ्यांची पाठतालुक्यात यावर्षी सर्वाधिक कपाशीचा पेरा झाल्यामुळे सोयाबीन या तेलवानाला दुसऱ्या क्रमांकाची पसंती मिळाली. २ ते ३ वर्षांपासून शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पेऱ्यात वाढ केली होती; परंतु त्याला भाव न मिळाल्यामुळे या पिकाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. दुसरीकडे सोया तेल हे महाग होत आहे; मात्र सोयाबीनला भाव मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. तालुक्यात पावसाची संततधार जर सुरू राहिली तर पीक चांगले होतील.नाहीतर शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागेल.