शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

कापसाला केवळ ५0 रुपयांची भाववाढ

By admin | Updated: October 30, 2015 02:02 IST

तीन वर्षांंपासून कापसाच्या हमीभावात नाममात्र वाढ.

नाना हिवराळे / खामगाव : कापूस पणन महासंघाकडून २0१५-१६ या वर्षाकरिता कापूस खरेदीसाठी हमी भाव जाहीर झाला आहे. गतवर्षीपेक्षा ५0 रुपये प्रती क्विंटल नाममात्र भाववाढ यंदा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांंंपासून पणन महासंघाने कापसाला दिलेला भाव हा सरासरी ५0 ते १00 रुपयांनीच वाढविलेला आहे. शेतकर्‍यांना योग्य हमी भाव देण्यासाठी कापूस पणन महासंघामार्फत कापूस खरेदी केली जाते. यासाठी कापसाची आधारभूत किंमत ठरविली जाते. यावर्षी ४ हजार १00 रुपये प्रतिक्विंटल भाव जाहीर केला आहे. खामगाव विभागात शेगाव, जळगाव जामोद, खामगाव, वरवट बकाल, मलकापूर, देऊळगाव राजा व देऊळगाव मही या ७ ठिकाणी पणन महासंघाची खरेदी केंद्रे आहेत. दरवर्षी १५ नोव्हेंबरनंतर कापूस खरेदी सुरू होते. गेल्या काही वर्षांंंपासून व्यापारी व पणन महासंघाच्या भावात तफावत येत असल्याने शेतकर्‍यांनी व्यापार्‍यांनाच कापूस विक्री करण्यास पसंती दिली आहे. यामुळे अनेकदा शासकीय कापूस खरेदी केंद्रे ओस पडलेली दिसून आली. व्यापार्‍यांकडून ४00 ते ५00 रुपयापर्यंंंत भाववाढ मिळत असल्याने शेतकरी कापूस विक्रीसाठी खासगी व्यापार्‍यांनाच पसंती देत आहे. २0१४-१५ या वर्षात पणन महासंघाने ४0५0 रुपये भाव दिला होता. तेव्हा खासगी व्यापारी यापेक्षा जास्त भाव देत असल्याने पणन महासंघाकडे १ लाख ७ हजार ३३ क्विंटलच कापूस खरेदी झाली होती. विभागातील जळगाव जामोद, शेगाव व देऊळगाव राजा या तीन ठिकाणीच कापूस खरेदी केंद्र गेल्या वर्षी सुरू होते. खामगाव, नांदुरा, मलकापूर व देऊळगाव मही या चार ठिकाणी भारतीय कापूस निगम (सीसीआय) च्यावतीने कापूस खरेदी झाली होती. यावर्षीही अवघी ५0 रुपये भाव वाढ पणन महासंघाने केली आहे. सध्या शेतकर्‍यांचा कापूस वेचणीचा हंगामही सुरू झाला आहे.

*व्यापा-यांकडून क्विंटलमागे ४,३00 रुपयांचा भाव

         यावर्षी निसर्गाच्या अवकृपेने खरीप हंगाम हातचा गेला आहे. शेतकर्‍यांचे हमी पीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या कपाशीचा पेरा मागील काही वर्षांंंपासून घटला आहे. कापसाचा पट्टा म्हणून ओळखल्या जाणार्‍या या भागात शेतकरी कपाशीपासून दूर गेला आहे. यावर्षी कापसाची भाववाढ चांगली होणार या अपेक्षेने शेतकरी भाववाढीच्या प्रतीक्षेत होता; परंतु ३९00-४१00 रूपये प्रति क्विंटल दरम्यान भाव जाहीर झाल्याने शेतकर्‍यांची पार निराशा झाली आहे. सद्य:स्थितीत ग्रामीण भागात व्यापार्‍यांनी कापूस खरेदी सुरू केली आहे. ४२00 ते ४३00 या दराने कापूस ते खरेदी करीत आहेत.पणन महासंघाच्या खरेदीला अद्यापही वेळ आहे. तोपर्यंंंत खाजगी व्यापारी पड्या भावानेच खरेदी करतील असा या क्षेत्रातील तज्ज्ञांचा होरा आहे. एकंदरीत यावर्षी कपाशीचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन नसल्याने कापसाला भाववाढ होण्याची शक्यता वर्तविली जात असली तरी तूर्तास तसे चित्र दिसून येत नाही. हंगामाची सुरुवात आता झाली असली तरी व्यापारीही तुलनेने कमी भावात कापूस खरेदी करीत आहेत.