शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine : बुलडाणा जिल्ह्यात दुसऱ्या डोसबाबत धोरणात्मक निर्णयाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 11:53 IST

Corona Vaccine: दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्यांची संख्या आता जिल्ह्यात एक लाखांपेक्षा अधिक झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात जवळपास साडेतीन महिन्यांपासून कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, पहिल्या डोससाठीच सर्वत्र धावाधाव आहे. आतापर्यंत केवळ ४३ हजार ४०७ व्यक्तींनाच दुसरा डोस जिल्ह्यात दिले गेले आहेत. त्यामुळे दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्यांची संख्या आता जिल्ह्यात एक लाखांपेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे यासंदर्भात त्वरित जिल्हास्तरावर धोरणात्मक निर्णय न घेतल्यास जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेत गोंधळ उडण्याची भीती व्यक्त होत आहे. वर्तमान स्थितीतच ५ एप्रिलपर्यंत पहिला डोस घेतलेल्या १ लाख ३९ हजार ८६९ नागरिकांपैकी तब्बल ९६ हजार ४६२ नागरिकांचा आठ आठवड्यांचा कालावधी संपुष्टात येत आहे. त्यादृष्टीने जिल्हास्तरावर नियोजन न झाल्यास प्रतिदिन जवळपास दहा हजार व्यक्तींची त्यात वाढ होत होऊन लसीकरण मोहिमेचे नियोजन कोलमडून पडण्याची शक्यता त्यामुळे ‘पुढे पाठ, मागे सपाट’ अशी स्थिती निर्माण होऊन लसीकरण मोहिमेत मोठा गोंधळच उडण्याची शक्यता आहे. त्यातच लसीचा पुरवठा हा मागणी आणि पुरवठ्याच्या व्यस्त प्रमाणात होत आहे. परिणामी पहिल्या व दुसऱ्या डोसमध्ये समतोल साधण्यासाठी व्यापक स्तरावर जिल्हा प्रशासनास दुसऱ्या डोसचा ड्यू आलेल्यांच्या लसीकरणास प्राधान्य द्यावे लागणार आहे. आगामी १५ दिवस तरी त्यास प्राधान्य द्यावे लागेल.

७० टक्के साठा दुसऱ्या डोससाठीयासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करताना उपलब्ध डोसपैकी ७० टक्के साठा दुसऱ्या डोससाठी वापरण्याच्या सूचना प्राप्त झाल्या असल्याचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी आर. जे. सांगळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. मात्र, निर्माण झालेली तफावत ही मोठी आहे. त्यामुळे दुसऱ्या डोसलाच प्राधान्य देण्याची गरज सध्या असल्याचे माजी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी अधोरेखित केले. दुसरीकडे आठवड्यातील दोन दिवस दुसऱ्या डोससाठी ठेवण्याबाबतही प्रशासनस्तरावर सध्या विचार मंथन सुरू आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसbuldhanaबुलडाणा