शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना अहवाल आता थेट रूग्णाच्या मोबाईलवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 16:32 IST

Corona report now directly on patient's mobile : खामगाव येथील सामान्य रूग्णालय प्रशानाने चक्क कोरोना अहवाल मोबाईलवर देण्यास सुरूवात केली आहे.

ठळक मुद्दे  रूग्ण आणि नातेवाईकांचे हेलपाटे वाचणार

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोना विषाणू संसर्ग कालावधीत ‘निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह’ होण्यासाठी स्बॅव खरेदी विक्रीचे गंभीर प्रकार चव्हाट्यावर आले. या कटू अनुभवातून बोध घेत, खामगाव येथील सामान्य रूग्णालय प्रशानाने चक्क कोरोना अहवाल मोबाईलवर देण्यास सुरूवात केली आहे. यामुळे रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा त्रास वाचणार असून, स्वॅब खरेदी-विक्रीच्या प्रकारावर नियंत्रण आणण्यास निश्चितच मदत होईल.कोरोना विषाणू संसर्गाच्या गंभीर आजाराच्या कालावधीत खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात स्वॅब खरेदी-विक्रीचा गंभीर प्रकार समोर आला. खामगाव येथील शिवांगी बेकर्स मधील तब्बल शंभरापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी ‘निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह’होण्यासाठी कोरोना स्वॅबची खरेदी केली. या स्वॅबद्वारे विम्याचा लाभ मिळविला. त्यामुळे सजग होत उपजिल्हा सामान्य रूग्णालयाने आता कोरोना तपासणी अहवाल आता थेट रूग्णांच्या नोंदणी केलेल्या मोबाईलवर देण्यास सुरूवात केली आहे. संदेशाची लिंक आणि क्यू-आर कोड संबंधितास उपलब्ध होणार असल्याने, रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा त्रास वाचेल. सोबतच इतर देश-विदेशात प्रवास करताना हे प्रमाणपत्र ग्राह्य धरल्या जाईल. याशिवाय कोरोना तपासणी अहवालाची प्रतीक्षाही आता थांबेल. त्यामुळे पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णाला वेळेवर उपचार घेणे शक्य होईल. कोरोन अहवालासाठी रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची पायपीट आता थांबणार आहे. कोरोना तपासणी केल्यानंतर संबंधित अहवालाचा संदेश थेट रूग्णाच्या नोंदणी केलेल्या मोबाईलवर जाईल व लिंकही दिली जाईल. त्यामुळे रुग्णांना आता प्रतीक्षा करावी लागणार नाही. बुलडाणा जिल्ह्यात एकमेव खामगाव उपजिल्हा रूग्णालयाने हा उपक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे.-डॉ. नीलेश टापरेनिवासी वैद्यकीय, अधिकारी, खामगाव.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkhamgaonखामगाव