शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

नियम डावलून अपार्टमेंटचे बांधकाम

By admin | Updated: January 3, 2015 00:58 IST

बुलडाणा जिल्ह्यातील प्रकार ; तांत्रिक अधिका-यांच्या अहवालानंतरही कारवाई नाही.

बुलडाणा: बिल्डींग बायलॉज व अपार्टमेंटचे सर्व नियम पायदळी तुडवून सुंदरखेड ग्रामपंचायत क्षेत्रात उभारण्यात येत असलेल्या टोलेजंग इमारती कशा बेकायदेशीर आहेत, याचा अहवाल तांत्रिक अधिकार्‍यांनी देऊनही या इमारतीचे बांधकाम थांबविण्याऐवजी प्रशासन याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सुंदरखेड ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी केला आहे. या इमारतीच्या परिसरातील रहिवाशांच्या जीविताला केव्हाही धोका होऊ शकतो, ही गंभीर बाब प्रशासनाच्या लक्षात का येत नाही, असा सवाल या भागातील नागरिकांनी केला आहे. बुलडाणा शहराला लागून असलेल्या सुंदरखेड व सागवन ग्रामपंचायत हद्दीकडे सध्या शहरातील धनदांडग्यांनी लक्ष केंद्रित केले असून, या भागात आपार्टमेंट व व्यावसायिक प्रतिष्ठाने उभारण्याचा सपाटा लावला आहे. सध्या सुंदरखेड ग्रा.पं. हद्दीत १६ अपार्टमेंटचे बांधकाम सुरू आहेत. ऑगस्ट २0१२ ते जून २0१३ या कालावधीत एकूण १६ अपार्टमेंटच्या बांधकामाला ग्रामपंचायतीने परवानगी दिली आहे. ही परवानगी देताना ग्रामपंचायतीने अटी व शर्तीची पूर्तता करून न घेता मोघमपणे परवानग्या दिल्या आहेत, तर संबंधित अपार्टमेंटच्या मालकांनीसुद्धा बिल्डींग बायलॉज आणि अपार्टमेंटचे सर्व नियम धाब्यावर ठेवून बांधकाम केले आहेत, त्यामुळे या परिसरात राहणार्‍या इतर नागरिकांना भविष्यात या इमारतीपासून धोका निर्माण होणार आहे, हे लक्षात आल्यानंतर ग्रामपंचायतीचे सदस्य विनोद तळेकर, कमलेश चंदन, प्रा. सुनील देशमुख, डॉ. अनंत शिरसाट यांच्यासह परिसरातील १५0 नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासन आणि मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या. वारंवार तक्रारी केल्यानंतर गटविकास अधिकारी यांनी तांत्रिक अधिकार्‍याकडून या १६ इमारतीची मोका पाहणी करून वरिष्ठांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.