शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस शासनाने मंजूर केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नये : दिलीपकुमार सानंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2017 00:55 IST

भाऊसाहेब फुंडकर, आकाश फुंडकरांवर सानंदांचा शाब्दीक हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : काँग्रेसच्या कार्यकाळात झालेल्या कामाचे पुन्हा भूमिपूजन करून ना. पांडुरंग फुंडकर व आ. आकाश फुंडकर श्रेय घेऊन जनतेची दिशाभूल करीत आहेत. ही बाब योग्य नसून, जुन्या कामांचे पुन्हा भूमिपूजन करण्याऐवजी नवीन विकास कामे मंजूर करून आणावी व त्याचे खुशाल श्रेय घ्यावे, केवळ श्रेयासाठी लोकांची दिशाभूल करू नये, असे आवाहन माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केले आहे.माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले, की आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात किडनी रुग्णांकरिता डायलिसीस युनिटचे बांधकाम करणे या कामाला निधी मंजूर करून आणला होता. या कामाला प्रशासकीय मान्यता ३१ मार्च २०१३ मध्ये मिळाली होती. मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी १६ जानेवारी २०१४ रोजी या कामाला तांत्रिक मान्यता दिली व २२ एप्रिल रोजी संबंधित कंत्राटदाराला हे काम सुरू करण्याचा कार्यारंभ आदेश देण्यात आला होता.सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या बाजूला असलेल्या एका हॉलमध्ये डायलिसीसच्या चार युनिटचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभही करण्यात आला होता. डायलिसीसची ही सेवा अखंडपणे सुरू आहे. या कामाबाबत माहिती २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी काढलेल्या ‘संकल्पसिद्धी’ या पुस्तिकेमध्ये डायलिसीसच्या बांधण्यात येणाऱ्या संभाव्य इमारतीच्या फोटोसह प्रकाशित करण्यात आलेली आहे; परंतु राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर तीन वर्षांचा कालावधी उलटल्यानंतरदेखील पालकमंत्री व आमदार डायलिसीस युनिटच्या उर्वरित कामासाठी निधी आणू शकले नाही. सामान्य रुग्णालयाला भव्य आकर्षक प्रवेशद्वार व संरक्षण भिंत तसेच सपाटीकरणाच्या कामालाही माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या कार्यकाळात मंजुरी मिळालेली होती. या कामाला कार्यारंभ आदेश २९ नोव्हेंबर २०१६ रोजी दिला होता. सपाटीकरण व इतर काम सुरू होऊन अनेक महिन्यांचा कालावधीदेखील उलटला आहे. तरीदेखील अगोदरच सुरू झालेल्या या कामाचे भूमिपूजन करून नागरिकांची दिशाभूल केली असल्याचेही सानंदा यांनी म्हटले आहे.