शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

आ. श्वेता महालेंच्या प्रयत्नाने चिखलीचा चेहरा-मोहरा बदलणार : सतीष गुप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:33 IST

चिखली : चिखली मतदारसंघात विकासाचे पर्व सुरु झाले असून आमदार श्वेता महाले यांच्या प्रयत्नातून चिखली कोट्यवधी रूपयांच्या विकासकामांना मान्यता ...

चिखली : चिखली मतदारसंघात विकासाचे पर्व सुरु झाले असून आमदार श्वेता महाले यांच्या प्रयत्नातून चिखली कोट्यवधी रूपयांच्या विकासकामांना मान्यता मिळालेली आहे. याद्वारे मतदारसंघाचा अविकसित चेहरा मागे पडणार आहे़ त्यामुळे आ. महाले यांच्या प्रयत्नातून अवघा मतदार संघातून चेहरा-मोहरा बदलून विकासशील चिखली म्हणून नावलौकिक होणार आहे, असे प्रतिपादन भाजपचे जेष्ठ नेते सतीष गुप्त यांनी केले.

आ. महाले यांच्या आमदार निधीमधून चिखली शहरात २४ ठिकाणी हायमास्ट लाईट बसविण्यात येत असून या कामाचा शुभारंभ भाजपाचे जेष्ठ नेते तथा चिखली अर्बन बँकचे अध्यक्ष सतीष गुप्त यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बाेलत होते. श्रेय घेण्याच्या चढाओढीमध्ये न पडता त्यांनी कामांचे श्रेय कार्यकर्त्यांना दिले आहे. त्यांनी त्यांच्या प्रयत्नांनी आणलेल्या विकास कामांचे भूमिपूजन पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हातून घेण्याची महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील पहिली घटना असल्याची प्रतिपादन सतीष गुप्त यांनी केले. यावेळी पं. स. सभापती सिंधू तायडे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक पंडितराव देशमुख, नगरसेवक गोविंद देव्हडे, शैलेश बाहेती, सुदर्शन खरात, सतीष खबुतरे, नामू गुरूदासाणी, सुभाषआप्पा झगडे, पंजाबराव धनवे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संतोष काळे, संजय आतार, सिद्धेश्वर ठेंग, सचिन शेटे, किरण पवार, सुरेश इंंगळे, अक्षय भालेराव, कैलास सपकाळ, रवींद्र वानखेडे यांची उपस्थिती होती. आमदार निधीतून चिखली शहरात २४ ठिकाणी हायमास्ट लाईट बसविणार येणार आहे. यामध्ये आण्णाभाऊ साठे चौक, खंडाळा रोड गजानन महाराज मंदिर, गांधी नगर हनुमान मंदिर, गोपाल किराणा, आदर्श शाळा, गोरक्षण वाडी, चर्चच्या मागे, चावडी जवळ, जिजाऊ नगर गणपती मंदिर, जुनागाव स्मशानभूमी, रेणुकादेवी मंदिर परिसर, नगरपालिका नूर चौक, बसवेश्वर चौक, बाजार समिती, बारभाई मोहल्ला, बैलजोडी, माळीपुरा कालिका देवी मंदिर, राऊत वाडी स्टॉप, वडारवाडी, वीर सावरकर पुतळा, शाहू नगर, सरकारी दावाखाना, सिंधी कॉलनी, राऊतवाडी स्मशानभूमी,, सैलानी नगर आदी ठिकाणचा समावेश असल्याने अवघे शहर उजाळणार आहे. (वा़ प्र )