शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी रूजू

By admin | Updated: April 27, 2017 00:14 IST

बुलडाणा: जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांची क्रीडा आयुक्त या पदावर बदली झाल्यामुळे जिल्हाधिकारी पदावर डॉ. चंद्रकांत लक्ष्मणराव पुलकुंडवार यांची नियुक्ती झाली.

बुलडाणा: जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांची क्रीडा आयुक्त या पदावर बदली झाल्यामुळे जिल्हाधिकारी पदावर डॉ. चंद्रकांत लक्ष्मणराव पुलकुंडवार यांची नियुक्ती झाली. त्यांनी आपल्या पदाचा पदभार बुधवारी स्वीकारला. यावेळी मावळते जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना पदाची सूत्रे दिली व जिल्हाधिकारी यांच्या खूर्चीत बसविले.डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची १८ जून १९९३ रोजी उपजिल्हाधिकारी म्हणून प्रशासनात नियुक्ती झाली. त्यांनी परिविक्षाधीन कालावधीमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथे तहसीलदार व राळेगांव येथे उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले. तसेच जिल्हा पुनर्वसन अधिकारी पदावरही त्यांनी यवतमाळ येथे काम केले. अमरावती जिल्ह्यात धारणी येथे १९९५ ते १९९७ मध्ये उपविभागीय अधिकारी, १९९९ पर्यंत विशेष भूसंपादन अधिकारी कृष्णा खोरे जालना, त्यानंतर उपविभागीय अधिकारी वसमत जि. हिंगोली, नांदेड-वाघाळा महानगरपालिकेत उपायुक्त, २००२ ते २००४ दरम्यान निवासी उपविभागीय अधिकारी नांदेड, त्यानंतर उपविभागीय अधिकारी परभणी, अंधेरी मुंबई येथे एमआयडीसीमध्ये भूव्यवस्थापक, ठाणे जिल्ह्यात महापे एमआयडीसीला क्षेत्रीय अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसी अंधेरी, २००८ते २०१० दरम्यान मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव, २०१० ते २०१४ मध्ये आरोग्य मंत्री यांचे खाजगी सचिव, १५ डिसेंबर २०१४ ते ५ सप्टेंबर २०१५ पर्यंत अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक, ३० एप्रिल २०१६ पर्यंत उप संचालक भूमी अभिलेख पुणे या पदावर कार्य केले आहे. तसेच त्यांना २९मार्च २०१६ रोजी आयएएस म्हणून पदोन्नत करण्यात आले. आयएएस म्हणून पहिली नियुक्ती गोंदीया जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर झाली. त्यानंतर बुलडाणा जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाली. ते मूळचे नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील आहे. त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे पशु विज्ञान शाखेत पदवी प्राप्त केली. तसेच पदव्युत्तर पदवी पशुविज्ञान (रोगचिकित्सा) शाखेत मिळविली आहे.