शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

सूक्ष्म सिंचनाच्या अनुदानाबाबत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पाळावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 23:03 IST

सूक्ष्म सिंचनाचे जिल्ह्यासाठी वाढीव अनुदान देण्याबरोबरच थकीत अनुदान तातडीने देण्यात यावे, अशी आग्रही मागणी सिंदखेड राजाचे शिवसेना आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी सभागृहात केली.

ठळक मुद्देआ.डॉ. शशिकांत खेडेकर यांनी विधानसभेत उपस्थित केला मुद्दावाढीव अनुदानाबरोबरच थकीत अनुदानही तातडीने देण्यात यावेभाऊसाहेब! अजून किती प्रतीक्षा करावी लागणार?

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : जिल्ह्यातील ठिबक व तुषार संचाचे थकीत अनुदान मिळण्याबरोबरच या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकºयांची संख्या मोठी असल्याने मंजूर अनुदान कमी पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी वाढीव अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे, या मागणीबाबत मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी गत हिवाळी अधिवेशनादरम्यान अधिवेशनाच्या पुढील सत्रात हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सूक्ष्म सिंचनाचे जिल्ह्यासाठी वाढीव अनुदान देण्याबरोबरच थकीत अनुदान तातडीने देण्यात यावे, अशी आग्रही मागणी सिंदखेड राजाचे शिवसेना आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी सभागृहात केली.विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रम या योजनेंतर्गत शेतकºयांना ठिकब व तुषार संच खरेदीसाठी देण्यात येणारे अनुदान गत तीन वर्षांपासून कृषी विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे लालफितशाहीत अडकले आहे. याअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील २८ हजार १७६ शेतकºयांचे एकूण ८७ कोटी ८१ लाख रुपये शासनाकडे थकलेले आहेत. याबाबत वारंवार मागणी होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.दरम्यान, ना.भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे कृषी व फलोत्पादन तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री पद आल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, अद्यापही शेतकºयांना अनुदान न मिळाल्याने शेतकरी अडचणीत आहेत. दरम्यान, आ.डॉ. शशिकांत खेडेकर यांनी ही बाब वारंवार विधानसभेत लावून धरली असता, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान गत १५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री ना.भाऊसाहेब फुुंडकर तसेच मंत्रालयातील विविध विभागाचे सर्व अधिकारी व सर्व जिल्हास्तरीय अधिकाºयांसमवेत बुलडाणा जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली होती.या बैठकीमध्ये आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांनी प्रामुख्याने सूक्ष्म सिंचनाचे थकीत व वाढीव अनुदान देण्याची मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी सूक्ष्म सिंचनाचे थकीत व वाढीव अनुदान अधिवेशनाच्या पुढील सत्रात देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार विधानसभा पावसाळी अधिवेशनाचे सत्र सुरू होताच, आ.डॉ. शशिकांत खेडेकर यांनी मुख्यमंत्र्यांनी गत अधिवेशनादरम्यान दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देत जिल्ह्यातील तब्बल २८ हजार १७६ शेतकरी सूक्ष्म सिंचन अनुदानाच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळावे व शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी लावून धरली.तसेच आ.डॉ. खेडेकर यांनी कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांना उद्देशून जिल्ह्यातील शेतकºयांचे सन २०१३-१४ व २०१४-१५ मधील सूक्ष्म सिंचनाचे थकीत अनुदान सुमारे ८७ कोटी रुपये अद्यापही न मिळाल्याने अडचणीत असलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांना पालकमंत्री त्याचबरोबर कृषिमंत्री या नात्याने ना. भाऊसाहेबांनी पुढाकार घ्यावा व हा प्रश्न तातडीने सोडविण्याची विनंती केली आहे.