शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

मिरची, मसाल्यांना महागाईचा ठसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:31 IST

एकदा लोणची, मसाला, चटणी बनविली असता वर्षभराची चिंता मिटत असल्याने लाल मिरची व मसाल्याचे पदार्थ खरेदीला पसंती दिली जात ...

एकदा लोणची, मसाला, चटणी बनविली असता वर्षभराची चिंता मिटत असल्याने लाल मिरची व मसाल्याचे पदार्थ खरेदीला पसंती दिली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील उन्हाळ्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. बाजारपेठ बंद असल्याने मिरची व मसाल्याचे पदार्थ फारसे खरेदी करता आले नाहीत. अनेकांनी तयार मसाले व चटणीला पसंती दिली होती. या वर्षीही कोरोना असला, तरी सध्या बाजारपेठ काही वेळ सुरू राहत आहे. त्यामुळे अनेक महिला लाल मिरची व मसाल्याचे पदार्थ खरेदी करण्यासाठी सरसावल्या आहेत. गतवर्षीपेक्षा लाल मिरची व मसाले पदार्थांच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे. तरीही अनेक गृहिणी मध्यम दर्जाच्या मसाल्याचे पदार्थ खरेदी करीत असल्याचे चित्र आहे.

मिरची येते परराज्यातून

जिल्ह्यात मध्यप्रदेश, आंध्र पदेशातून लाल मिरची विक्रीसाठी येते. जिल्ह्यात काही शेतकरी मिरचीची लागवड करीत असले तरी हिरव्या मिरच्या विक्रीलाच पसंती दिली जाते. क्वचित शेतकरी लाल मिरच्या विक्री करतात. त्यामुळे बाहेरील राज्यांतूनच लाल मिरची आयात करावी लागते. जिल्ह्यात गावरान मिरचीला मागणी असली तरी कमी किमतीच्या विविध मिरच्या विक्रीसाठी आल्या आहेत.

मिरचीचे दर (प्रति किलो)

सिमला - ३००

चपाटा - ३००

बन्ना- २८०

लवंगी - १८०

मसाल्याचे दर (प्रति किलो)

धने - १२०

जिरे - १६०

तीळ - १२०

खसखस - ११००

खोबरे - २००

मेथी - ८०

हळद - १२०

अन्य मसाले (प्रति दहा ग्रॅम)

लवंग - १०

बदामफुल - १०

बडीशेप - ३

नाकेश्वर - २०

धोंडफूल - ७

वेलदोडे - ४०

गृहिणी म्हणतात...

मसाला, वेगवेगळ्या चटण्या दरवर्षी उन्हाळ्यातच करून ठेवत असतो. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे अनेक वस्तू वेळेवर उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे यंदा अगोदरच सर्व साहित्य खरेदी केले आहे. मसाल्याच्या दरामध्ये किंचितशी वाढ झाल्याचे दिसून येते.

- कोमल पवार, गृहिणी.

दरवर्षी मसाला, चटणी, लोणची घरीच करतो. गतवर्षीपेक्षा मसाल्याच्या दरामध्ये काही प्रमाणात वाढ झालेली आहे. आता उन्हाळा सुरू झाला असून, मसाले, चटण्या बनविण्यास सुरुवात केली आहे.

- वनिता गावंडे, गृहिणी.