शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

मुलाने रचले अपहरणाचे बनावट नाट्य!

By admin | Updated: June 6, 2017 00:03 IST

वडील रागावण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : वडील रागावतील, या भीतीमुळे एका ११ वर्षीय मुलाने अपहरण झाल्याचे बनावट नाट्य रचल्याची घटना ५ जून रोजी मोताळा येथे उघडकीस आली. ४ जून रोजी मुलाच्या अपहरणाच्या घटनेमुळे मोताळा तालुक्यात खळबळ उडाली होती.मोताळा वार्ड नं.८ येथील रहिवासी शेख खालीद शेख हारुण यांनी ४ जून रोजी पोलीस स्टेशनला माहिती दिली की, त्यांचा मुलगा शेख वाजीद शेख खालीद (वय ११) याने संध्याकाळी ४.३० वाजताच्या फोन करून त्याचे अपहरण झाल्याचे सांगितले. शेख वाजिदला चार लोकांनी उचलून नेऊन स्टेट बँक मोताळा मागील नदीमध्ये हात बांधून ठेवले होते. मी कसातरी हाताची दोरी तोडून आलो, असे मुलाने सांगितल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. याबाबत ५ जून रोजी सदर घडलेल्या घटनेबाबत चौकशीदरम्यान शेख वाजीद शेख खालीद यास विचारपूस केली असता त्याने स्वत:च अपहरणाचे बनावट नाट्य रचल्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, ‘एकदा माझ्याकडून माझ्या वडिलांच्या मोबाइलचे मेमरी कार्ड तुटले होते. माझे वडील माझ्यावर त्यावेळी रागावले होते. काल माझ्या वडिलांचे मोबाइलचे दुसरे मेमरी कार्ड गाणे भरण्याकरिता घेऊन गेलो असता, ते मेमरी कार्ड पुन्हा तुटले, वडील रागावतील, या भीतीने मी घरी गेलो नाही. स्टेट बँक मोताळा मागील नदीमध्ये बसून राहिलो, संध्याकाळी ४.३० वाजता घरी जावून वडिलांना खोटे सांगितले की, मला चार लोकांनी उचलून नेऊन नदीमध्ये हात बांधून ठेवले व मला मुंबईला पळवून नेतो, असे खोटे सांगितले, असे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे शेख वाजीद याने वडिलांच्या भीतीमुळे अपहरण झाल्याचे बनावट उघडकीस आले. सदर घटनेबाबत ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय गजानन वाघ यांनी चौकशी करून अपहरणाचा बनावट प्रकार उघडकीस आणला.