खामगाव: भरधाव ट्रकने जीपला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात खामगाव येथील सहा वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना २८ मे रोजी नांदेड-पुणे मार्गावरील इंदापूर येथे घडली. मृतक तहसीलदारांचे जीपचालक सचिन ठाकरे यांचा मुलगा आहे. या अपघातात देवांश ठाकरे याच्यासह तीन जण जागीच ठार झाले, तर सहा जण जखमी झाले. प्राप्त माहितीनुसार खामगाव येथील तहसीलादारांचे चालक सचिन ठाकरे यांची सासुरवाडी पुणे आहे. ठाकरे यांच्या साळीच्या विवाहासाठी ठाकरे यांच्या पत्नी आपल्या सहा वर्षांच्या मुलासह पुणे येथे गेल्या. दरम्यान, बुधवार २८ मे रोजी एम एच १२ जी झेड ६0१३ या क्रमाकांच्या चारचाकी वाहनाने सचिन ठाकरे यांचे नातेवाईक नांदेड येथून पुण्याकडे जात असताना इंदापूरजवळ भरधाव ट्रकने जीपला जबर धडक दिली. यामध्ये देवांश सचिन ठाकरे (६) रा. खामगाव, क्रांती बंडू पाटील, शिवाजी नागोराव मोरे रा. पुणे यांचा जागीच मृत्यू झाला. तर मनीषा सचिन ठाकरे, प्रतिभा शिवाजी मोरे, रेखा बाबाजी भोसले, वर्षा पुंडलिक सावळे, बाळू बंडू पाटील, रघुनाथ शिवाजी मोरे, रघुनाथ मोरे गंभीर जखमी झाले.
रस्ता अपघातात बालक ठार
By admin | Updated: May 30, 2014 00:38 IST