शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

चिखली तालुक्याने पार केला गाळ उत्खनाचा मॅजीक फिगर!

By admin | Updated: June 17, 2016 02:02 IST

लोकसहभागातून काढला १६ लाख ६१ हजार घनमिटर गाळ; ३ हजार ३२२ हेक्टरावर सिंचनाची सोय.

सुधिर चेके पाटील / चिखली (बुलडाणा) सतत पडणारा दुष्काळ तसेच पाणी टंचाई यावर मात करण्यासाठी चिखलीचे तहसीलदार विजय लोखंडे यांनी लोकसहभागातून गाळ काढण्यासाठी घेतलेल्या विशेष प्रयत्नांना तालुक्यातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन या मोहिमेत मोठा सहभाग दिल्याने यंदा तालुक्यातील विविध गावांतील ४६ उपसा, पाझर तसेच अन्य लहान-मोठय़ा जलाशयांतून तब्बल १६ लाख ६१ हजार ५२0 घनमीटर गाळ काढण्यात यश आले असून, गाळ उत्खननासाठी प्रशासनाने निर्धारित केलेला पाच लाख ब्रासचा ह्यमॅजिक फिगरह्ण ओलांडल्याने जलाशयांनी मोकळा श्‍वास घेतला आहे.गेल्या चार वर्षांंपासून होणार्‍या अत्यल्प पावसामुळे तालुक्यातील सर्वच लहान-मोठे तलाव कोरडे पडले आहेत. त्यातच भूजल पातळी कमालीची खालावली असून, वाढत्या तापमानामुळे सद्य:स्थितीत केवळ सहा टक्के जलसाठा शिल्लक आहे. दुष्काळाची ही स्थिती पाहून हवालदिल होण्यापेक्षा दुष्काळाला इष्टापत्ती समजून गतवर्षाप्रमाणे यावर्षीही गाळ काढण्याची मोहीम लोकसहभागातून यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. सबंध राज्याचे लक्ष वेधले जाईल एवढय़ा प्रमाणात गाळ यावर्षी काढण्याचे नियोजन तालुकास्तरावर तहसीलदार विजय लोखंडे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. यानुषंगाने तहसीलदारांच्या मार्गदर्शन व नेतृत्वात मंडळनिहाय समित्यांचे गठन करून त्यांच्यावर आपल्या भागातील जलाशयांतील गाळ काढण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. तहसीलदार विजय लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली गठित मुख्य समितीमध्ये तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी यांचा समावेश असून, या समितीच्या नियंत्रणाखाली चिखली, अमडापूर, उंद्री, एकलारा, कोलारा, मेरा, हातणी, धोडप, पेठ, शेलगाव, चांधई या महसूल मंडळनिहाय समित्यांचे गठन करण्यात आले. या मंडळ स्तरावरील समित्यांचे अध्यक्ष महसूल मंडळ अधिकारी होते, तर सदस्यांमध्ये तलाठी, ग्रामसेवक, कृषिसेवक, कृषी मंडळ अधिकारी, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांच्यासह विविध विभागांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. या मोहिमेंतर्गत यंदा पाच लाख ब्रास गाळ काढण्याचे लक्ष्य तहसीलदार लोखंडे यांनी ठेवले होते.