शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

चिखली उप जिल्हा रुग्णालयासाठी निधी देणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 23:04 IST

चिखली : येथील शासनाकडून मंजूर उप जिल्हा रुग्णालयासंदर्भात आमदार राहुल बोंद्रे यांनी विधानसभेत २ आॅगस्ट रोजी निधीचा प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले असता, आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी चिखली उप जिल्हा रुग्णालयासाठी निधी तातडीने मंजूर व्हावा, यासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे विशेष बाब म्हणून परवानगी घेणार असल्याचे स्पष्ट केल्याने चिखली उप जिल्हा रुग्णालयाचे काम मार्गी लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

ठळक मुद्देआ. राहुल बोंद्रे यांच्या प्रश्नावर आरोग्य मंत्र्यांचे स्पष्टीकरणकाम मार्गी लागणार असल्याने आशा पल्लवितउप जिल्हा रुग्णालयास जोडून मनोरुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : येथील शासनाकडून मंजूर उप जिल्हा रुग्णालयासंदर्भात आमदार राहुल बोंद्रे यांनी विधानसभेत २ आॅगस्ट रोजी निधीचा प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले असता, आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी चिखली उप जिल्हा रुग्णालयासाठी निधी तातडीने मंजूर व्हावा, यासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे विशेष बाब म्हणून परवानगी घेणार असल्याचे स्पष्ट केल्याने चिखली उप जिल्हा रुग्णालयाचे काम मार्गी लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.चिखली येथील उप जिल्हा रुग्णालय व या रुग्णालयावर मतदारसंघाबरोबरच मराठवाड्यातील मोठा परिसर, त्याचबरोबर सोलापूर-मलकापूर-खामगाव- जालना-बुलडाणा-वाशिम या महामार्गावरील चिखली उप जिल्हा रुग्णालयाचे स्थान लक्षात घेता येथे स्वतंत्र ट्रामा केअर सेंटर व्हावे, अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून विधानसभेत आमदार राहुल बोंद्रे यांनी लावून धरली होती. परंतु, उप जिल्हा रुग्णालय मंजूर असतानाही निधीची तरतूद नसल्याने या रुग्णालयाचे काम रखडले होते. याकडे २ आॅगस्ट रोजी विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आलेल्या अतारांकित प्रश्नाच्या अनुषंगाने उपस्थित करण्यात आलेल्या अर्धा तास चर्चेदरम्यान शासनाचे लक्ष वेधले. उप जिल्हा रुग्णालयाला मंजुरी प्राप्त होऊनही निधीअभावी पुढील काम रखडले असल्याची बाब सभागृहाच्या लक्षात आणून दिली.़ त्यावर स्पष्टीकरण देताना आरोग्य मंत्री ना. दीपक सावंत यांनी निधी तातडीने मंजूर व्हावा, यासाठी विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री यांच्याकडून परवानगी घेऊन निधी मंजूर केला जाईल, असे स्पष्ट केले़ आ.बोंद्रे यांनी तीर्थक्षेत्र सैलानी येथे श्रद्धेपोटी येणारे मनोरुग्ण यांचा प्रश्न उपस्थित करून, तेथे अद्ययावत मनोरुग्णालय उभारण्याची मागणी पूर्वीपासून असल्याचे सांगत, हे मनोरुग्णालय उभारण्यात येणार काय? असा प्रश्न विचारला असता, आरोग्य मंत्र्यांनी सैलानी या ठिकाणी असलेल्या उपलब्ध सुविधा पाहता तेथे मनोरुग्णालय उभारणे अवघड होईल, असे सांगून सैलानी हे तीर्थक्षेत्र चिखली मतदारसंघात येत असल्याने येथील उप जिल्हा रुग्णालयास जोडून मनोरुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्याचा आदेश संबंधितांना दिला़ या चर्चेमुळे उपजिल्हा रूग्णालयासाठी निधी, उपजिल्हा रुग्णालयाला जोडून स्वतंत्र ट्रामा केअर सेंटर, असे प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.