शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

चिखलीत पेट्रोल पंप चालकास दहा हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:34 IST

चिखली : जिल्ह्यात घोषित दहा दिवसांच्या निर्बंध दरम्यान अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी सोडून खासगी वाहनांना पेट्रोल, डिझेल न देण्याचे आदेश ...

चिखली : जिल्ह्यात घोषित दहा दिवसांच्या निर्बंध दरम्यान अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी सोडून खासगी वाहनांना पेट्रोल, डिझेल न देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. मात्र असे असतानाही शहरातील एका पेट्रोल चालकांकडून नियमांचा उल्लंघन केले जात असल्याचे लक्षात येताच महसूल व नगरपालिका प्रशासनाने दहा हजारांचा दंड वसूल करून चांगलाच दणका दिला आहे.

काेराेना संक्रमण राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत़ या काळात सुरूवातीला अत्यावश्यक सेवा आणि माध्यम प्रतिनिधींनाच पेट्रोल, डिझेल देण्याबाबत आदेशित केले होते. दरम्यान ११ मे रोजी सुधारित आदेशानुसार शेतकऱ्यांना शेतातील मशागतीची कामे करण्यासाठी व शेतमालाच्या वाहतुकीसाठी ट्रॅक्टर आणि वकिलांना देखील इंधन देण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. असे असताना येथील रेणुका पेट्रोल पंपावर बेकायदेशीर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश पायदळी तुडवत खासगी वाहनांना सर्रासपणे पेट्रोल, डिझेल दिले जात होते. तथापि यामुळे पेट्रोल पंपावर मोठी गर्दी उसळली होती. याबाबत माहिती मिळताच नगरपालिका व महसूलच्या पथकाने पेट्रोल पंपावर धाव घेऊन पेट्रोल पंपधारकास याबाबत विचारणा केली असता त्यांनी पथकासोबत हुज्जत घातली. याठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याची माहिती तहसीलदार अजितकुमार येळे यांना देण्यात आली. दरम्यान तहसीलदारांनी तातडीने पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यावरून पंपावर प्रचंड गर्दी व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १२ मे रोजी नगरपालिकेने पेट्रोल पंप चालकांना १० हजार रूपयांची दंडात्मक कारवाई केली. ही कारवाई नायब तहसीलदार वीर, तलाठी गिरी, भुसारी यांच्यासह नगरपालिकेचे फिरते पथक पथक प्रमुख आत्माराम इंगळे, राजेंद्र रावे, फकिरा शिंगणे, राजू देशमुख, सुभाष दांडगे यांनी केली.

पेट्रोलसाठी लढविली जातात क्लुप्त्या !

लॉकडाऊनच्या काळातही विनाकारण फिरण्याची हौस असणारे काहीजण पेट्रोल मिळवण्यासाठी विविध क्लुप्त्या वापरत आहेत. अत्यावश्यक सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना हाताशी धरून किंवा त्यांच्या 'आय कार्ड'चा वापर करून वाहनांमध्ये इंधन भरण्यात येत आहे.